व्यथा : अल्पवयीन मुलीच्या गर्भपातासाठी नागपूर उच्चन्यायालयत धाव - नराधम मित्राला कठोर शिक्षेची पित्याची मागणी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

व्यथा : अल्पवयीन मुलीच्या गर्भपातासाठी नागपूर उच्चन्यायालयत धाव - नराधम मित्राला कठोर शिक्षेची पित्याची मागणी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : वरोरा -


वडिलाच्या मित्रानेच बलात्कार केल्यामुळे गर्भधारणा झालेल्या अल्पवयीन मुलीने गर्भपाताची परवानगी मिळण्यासाठी मुुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पित्याने धाव घेतली आहे. अल्पवयीन मुलगी २३ आठवड्याची गर्भवती आहे.

नागपूर खंडपीठाने गुरुवारी प्रकरण ऐकल्यानंतर मुलीच्या आवश्यक तपासण्या करण्यासाठी पाच डॉक्टर्सचे वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचा आदेश चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना दिला. 

या मंडळात गायनॉकॉलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, कॉर्डिओलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट व पॅथॉलॉजिस्टचा समावेश असणे आवश्यक आहे. तसेच, मंडळ सदस्यांमध्ये दोन महिला डॉक्टर असाव्यात असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले.

पीडित मुलीला ६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता मंडळापुढे हजर करावे. मंडळाने तिच्या आवश्यक तपासण्या करून ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजतापूर्वी अहवाल सादर करावा, असेही न्यायालयाने सांगितले. 

प्रकरणावर न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. पुढील सुनावणी ८ एप्रिल रोजी निश्चित करण्यात आली आहे. पीडित मुलीतर्फे अ‍ॅड. स्विटी भाटिया यांनी कामकाज पाहिले.

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल -
पीडित मुलगी चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव येथील असून ती १२ वर्षे ४ महिने वयाची आहे. तिच्या वडिलाचा मित्र आरोपी योगेश रामचंद्र दोहतारे याने तिच्यावर केला अशी तक्रार १४ मार्च २०२० रोजी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. त्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.