जि.प. सदस्य संजय गजपुरे यांचे पुढाकाराने ग्रामपंचायतींना मेगाफोन वितरित - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जि.प. सदस्य संजय गजपुरे यांचे पुढाकाराने ग्रामपंचायतींना मेगाफोन वितरित

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : नागभीड -

      
सध्या सर्वत्र कोरोना महामारी पासुन नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी विविध माध्यमातुन प्रशासनाद्वारे नागरिकांना अवगत व प्रशिक्षित केल्या जात आहे. गावागावात ग्रामपंचायतींच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणावर जनजागृतीही केल्या जात आहे. 

      
नागभीड तालुक्यातील पारडी- मिंडाळा - बाळापुर क्षेत्राचे जि. प. सदस्य तथा भाजपा चंद्रपुर जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांनी तालुक्यात कोरोना या रोगापासुन स्वत:ला कसे सुरक्षित ठेवता येईल याबाबतचे पत्रक वितरण नागभीडसह प्रत्येक गावात कार्यकर्त्यांच्या माध्यमातुन सुरु केले आहे. आरोग्य यंत्रणेसोबतच या अभियानात सहभागी प्रत्येकांशी ते सातत्याने संवाद साधत असुन दैनंदिन आढावा घेत आहेत.

            
गावात दररोज कोरोना संदर्भात जनजागृती करण्यासाठी येणारी अडचण लक्षात घेत चंद्रपुर जिल्हापरिषदेच्या पंचायत विभागामार्फत जिल्हा निधीतुन मंजुर करण्यात आलेल्या मेगाफोन चे वितरण त्वरीत करावे अशी मागणी संजय गजपुरे यांनी जि.प.अध्यक्षा सौ.संध्याताई गुरनुले व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांना केली . या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नागभीडच्या संवर्ग विकास अधिकारी कु.प्रणाली खोचरे - गायकवाड मॅडम यांना सुचना देण्यात आली. 

           
त्यानुसार पारडी - मिंडाळा - बाळापुर जि.प.क्षेत्रातील प्रत्येक गावात कोरोना संदर्भात जनजागृती करण्यासाठी जिल्हा निधीच्या माध्यमातुन जि.प.सदस्य संजय गजपुरे यांचे तर्फे प्रत्यक्ष भेट देऊन प्रत्येक ग्रा.पं.ला मेगाफोन वितरित करण्यात आले. यावेळी प्रत्येक ग्रा.पं.ला उपस्थित सरपंच , ग्रामसेवक , ग्रा.पं. सदस्य यांना या मेगाफोनचा वापर जनजागृती करण्याची विनंती गजपुरे यांनी केली. प्रत्येक गावात १४ व्या वित्त आयोगातुन घरोघरी साबण वितरित करणे व गावात जंतनाशक फवारणीचा तयेच स्वच्छता कार्याता आढावा याप्रसंगी घेण्यात आला. 
            
मेगाफोन त्वरीत उपलब्ध करुन दिल्याबद्दल जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी जि.प.च्या अध्यक्षा सौ.संध्याताई गुरनुले , माजी अध्यक्ष देवरावजी भोंगळे यांचे आभार मानले आहे. मेगाफोन वितरण करतेवेळी पं.स.नागभीडचे अधिकारी राजु बावणे, कृऊबास संचालक धनराज ढोक , धनराज बावणकर, विनोद हजारे इ. पदाधिकारी यांची उपस्थिती होती.