झरण वनपरिक्षेत्र अंतर्गत लाकडाऊन च्या काळात लाकूडकटाईचे काम सुरु :स्थानिक मजुरांना मिळाला काम : सोशल डिस्टन्स चे पाळले जात आहे नियम - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

झरण वनपरिक्षेत्र अंतर्गत लाकडाऊन च्या काळात लाकूडकटाईचे काम सुरु :स्थानिक मजुरांना मिळाला काम : सोशल डिस्टन्स चे पाळले जात आहे नियम

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गोंडपिपरी -

आज कोरोना महा मारीमुळे देशभरासह राज्यावर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.त्यामुळे संचार बंदीचा कालावधीला एक महिना पूर्ण झाला असून आणखी तो वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. अश्यातच राज्याला  आर्थिक संकटापासून सावरण्यासाठी शासनाने शेती व्यवसाय , मत्स व्यवसाय तसेच काही उद्योग धंद्यांना संचार बंदीच्या अटी व नियमांचे पालन करून शिथिलता दिलेली आहे.  

अश्यावेळी झरण वनपरिक्षेत्रातर्गत  संचार बंदीच्या काळात वन अधिकारी व कर्मचारी संचार बंदी च्या अटी व नियमानुसार वनांमध्ये गस्त करणे, आगीपासून जंगलाचे सरक्षण करणे, वन्यप्राणाचे शिकारी पासून रक्षण करणे, अवैध तोड रोखणे यासारख्या अत्यावश्यक सेवा पुरवीत आहेत.  

राज्य सरकारच्या6 दिनांक 21/04/2020 रोजीच्या अधी सूचनेनुसार वानिकी कामाला देखील शिथिलता प्राप्त झालेली आहे. रोपवन करण्याकरिता पूर्व पावसाळी कामे करणे अत्यंत गरजेचे असल्याने मध्य चांदा विभागातील इतर वनपरिक्षेत्र प्रमाणे झरण वनपरीक्षेत्रातील कक्ष क्रमांक 4  व इतर ठिकाणी  संचार बंदीचे नियम पाळून कामे सुरू आहेत.  

शासन स्तरानुसार  कामावर असलेल्या मजुरांना मास, सॅनिटायझर आणि वेळोवेळी हात धून्यासाठी साबण इत्यादीचा पुरवठा करण्यात आला आहे. यामुळे  कॉरोना  च्या पार्वभूमीवर गोंडपीपरी तालुक्यातील काही गावांना रोजगार उपलब्ध होत आहे. मजुरांना मागील एका महिन्या पासून रोजगार उपलब्ध नसल्याने उदर निर्वाह कसा करायचा याचा प्रश्न मजुरांसमोर भेडसावत होता.  

त्या अनुषंगाने झरण वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी मजुरांना पूर्व पावसाळी कामे उपलब्ध करून दिल्याने मजुरांचे पोटा पाण्याचा प्रश्न सुटण्यास व कुटुंबास आर्थिक दिलासा मिळन्यास मदत होत आहे  स्थानिक व गोंडपिपरी तालुक्यातील मजुरांना काम मिळाल्यामुळे मजुरांचा काही प्रमाणात रोजगाराचा प्रश्न  मिटला आहे.         

पावसाळा सुरू होण्यापूर्वी काम करणे अत्यंत आवश्यक असल्याने शासनाच्या जीआर नुसार सोशल डिस्टन्स पाळून मजुराकरवी काम सुरु आहे त्यांना मास्क,सानिटायझर व हॅन्ड वाश पुरवण्यात आला असून खबरदारी घेतल्या जात आहे त्यामुळे काम नियमानुसारच सुरु आहे.-अनिकेत मोटे, वन अधिकारी वनपरिक्षेत्र झरण