देशभरात आज शनिवार पासून ही दुकानं होणार सुरू - गृहमंत्रालया निर्णय - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

देशभरात आज शनिवार पासून ही दुकानं होणार सुरू - गृहमंत्रालया निर्णय

Share This

🧐   देशातील नोंदणीकृत असलेली सर्व दुकाने काही अटींवर सुरू करण्याची आता परवानगी देण्यात आली आहे.
📢   शनिवारी म्हणजेच आज सकाळपासून हा आदेश लागू होणार आहे


हा निर्णय आणखी सविस्तर समजून घ्या खाली...

खबरकट्टा / थोडक्यात -

▪️   केंद्र सरकारने दुकाने उघडण्याची सवलत देताना काही अटी घातल्या आहेत.

▪️   जी दुकाने नोंदणीकृत आहेत त्यांनाच ही परवानगी असणार आहे. दुकानात ५० टक्के कर्मचारीच काम करू शकतील.

▪️   पालिका व नगरपरिषद हद्दीतील बाजारपेठांमध्ये जी दुकाने आहेत ती उघडण्यास मनाई असेल

▪️   ही दुकाने ३ मे पर्यंत उघडता येणार नाहीत.त्याचवेळी पालिका वा नगरपरिषद हद्दीबाहेरील दुकाने 

▪️   मात्र उघडता येणार आहेत ,मात्र यामध्ये  शॉपिंग मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स उघडता येणार नाही 

▪️   हा नियम हॉटस्पॉट असणाऱ्या शहरांना आणि जिल्ह्यांना लागू होणार नाही

20 एप्रिल नंतर घेतलेला हा दुसरा मोठा निर्णय आहे. तरीही दुकानदारांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचना आदेशानुसार अंमलबजावणी  करावी.