चंद्रपूर बिग ब्रेकिंग :: रहमतनगर सील - खबरदारी म्हणून निर्जंतुकीकरण व सर्व रस्ते बंद - सील करण्यात आलेला जिल्ह्यातील पहिला वॉर्ड - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर बिग ब्रेकिंग :: रहमतनगर सील - खबरदारी म्हणून निर्जंतुकीकरण व सर्व रस्ते बंद - सील करण्यात आलेला जिल्ह्यातील पहिला वॉर्ड

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : 
कोरोना च्या वाढत्या दहशतीत खबरदारी उपाय म्हणून चंद्रपुरातील नागरिक रफिक मेमन यांच्या निधनानंतर प्रशासनाने रहमतनगर पूर्णपणे सील केले असून या प्रभागाकडे जाणारे सर्व रस्तेसुद्ध सील करण्यात आले आहेत. 

महानगरपालिकेने रहमानतनगर भागाचे निर्जंतुकीकरण केले आहे. प्रशासनाच्या या कार्यवाही मुळे चंद्रपूर शहरात नेमके काय सुरु आहे याबाबत प्रचंड चर्चा सुरु असून रहमत नगर येथील व्यापारी रुग्णाचे नागपूर उपचारदरम्यान सोमवारी निधन झाले होते. त्यांना कोरोना लागण झाल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली होती मात्र त्यांचा रिपोर्ट नेगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. 
दरम्यान जटपुरा गेटवरील डॉ. नगराळे यांच्या खाजगी रुगालयात या रुग्णावर  यांच्यावर 25 ते 27 मार्च दरम्यान उपचार करण्यात आले होते. डॉ. नगराळे यांनी उपचाराची माहिती लपविल्या कारणाने महानगर पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. खेरा यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाणे येथे कलम 188 अंतर्गत काल 1 एप्रिल ला गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. सदर रुग्णाचे  निधन आणि दिल्ली येथील निजामुद्दीन मकरस मधील घटनेच्या  पाश्वभूमीवर रहमतनगर सील करण्यात आले आहे. रहमतनगर कडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर बॅरिकेट्स लावून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागिनबाग, बिनबा गेट तसेच शांतीधाम जवळील इरई नदी कडून येणारे मार्ग बंद असून बाहेरील कोणत्याही व्यक्तीला या भागात जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे. फक्त खबरदारी उपाय म्हणून रहमतनगर सील करण्यात आले आहे.नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही फक्त दक्षता बाळगा - राजेश मोहिते,आयुक्त मनपा चंद्रपूर.