कोरोनामध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचा मृत्यू झाल्यास, तर त्यांना शाहिद म्हणून दर्जा द्यावा - खासदार बाळू धानोरकर #baludhanorkar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरोनामध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचा मृत्यू झाल्यास, तर त्यांना शाहिद म्हणून दर्जा द्यावा - खासदार बाळू धानोरकर #baludhanorkar

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर -

कोरोना विषाणू हा जगात हाहाकार करीत आहे. देशात तसेच राज्यात देखील कोरोनामुळे थैमान मांडले आहे. कोरोना पासून बचाव करणे म्हणजे जणू युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा देणारे त्यात  आरोग्य विभाग, पोलिस, वेकोली कामगार, वीज कर्मचारी व सफाई कर्मचारी या सारख्या विभागातील अधिकारी कर्मचारी सैनिक सारखे लढत आहे. या लढ्यात कोणाच्या मृत्यू झाल्यास त्यांना शहीद चा दर्जा देण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडॆ केली आहे. 
             
कोरोना विषाणुच्या गंभीर संसर्गामुळे केवळ आपला भारत देशच नाही तर संपूर्ण जगच त्रस्त आहे. अतिशय संसर्गजन्य अशा कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात देखील दिवसागणिक वाढतच आहे. मात्र, या कठीण परिस्थितीत आरोग्य विभाग, पोलिस, वेकोली कामगार, वीज कर्मचारी व सफाई कर्मचारी अहोरात्र जीवाचे राण करून, जीवावर उदार होऊन सेवा देत आहेत. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कोरोना चा लढ्यात दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांना शहीद च्या दर्जा देण्याची मागणी खासदार धानोरकर यांनी केली आहे. 
        
कोरोना बाधीत, संशयित रूग्णांची सेवा आरोग्य विभागाचे डॉक्टर्स, कर्मचारी अहारोत्र करीत आहेत. पोलिस अधिकारी व कर्मचारी देखील जनतेला संसर्ग होऊ नये म्हणून अहोरात्र पहारा देत आहत. जनतेच्या आरोग्यासाठी सफाई कर्मचारी देखील सेवेत आहेत. वीज निर्मिती अखंड राहावी म्हणून वेकोली कामगार व वीज कर्मचारी देखील तत्परतेने सेवा देत आहे.  इतक्या गंभीर संसर्गजन्य विषाणुला मात देण्यासाठी हे सर्व जीवावर उदार होऊन सेवा देत आहेत. याकरिता त्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांना शहीद म्हणून दर्जा दिल्यास त्यांच्या या कार्याला सलाम असेल असे मत  खासदार धानोरकर यांनी व्येक्त केले.