द्विवेदी बंदूक हत्याकांडात धक्कादायक माहिती : चॊकशीची नागरिकांची मागणी #ballarpur-gun-fire-case - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

द्विवेदी बंदूक हत्याकांडात धक्कादायक माहिती : चॊकशीची नागरिकांची मागणी #ballarpur-gun-fire-case

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर -बल्लारपूर येथे घडलेल्या बंदूक गोळीबारातून झालेले बाप-लेक हत्याकांड जिल्ह्यात सर्वत्र चर्चेत आहे. या हत्याकांडात अवघे आयुष्य बंदूकधारी असलेल्या वडिलांनी आपल्या दोन मुलांना गोळी मारल्यानंतर स्वतःवर सुद्धा गोळी झाडून घेतल्याने बाप -लेकाचा मृत्यू झाला असून दुसरा मुलगा नागपूर येथे उपचारार्थ मृत्यूशी झुंज देत आहे.

हे कौटुंबिक प्रकरण नेमके कश्यामुळे घडले याचा अजून स्पष्ट खुलासा झाला नसला तरीही पोलीस चौकशीत काही धक्कादायक बाबी समोर आल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे.

हत्याकांड घडलेल्या परिवारातील 6 सदस्यांकडे बंदुकीचे शासकीय परवाने असून, एका सामान्य कुटुंबात सर्वच सदस्यांकडे कोणत्या आधारावर हे परवाने दिल्या गेलेत यावर अनेक प्रश्नचिह्न उठत आहेत.

या सर्व सदस्यांना स्वसंरक्षण या निकषावर हे बंदूक परवाने जारी करण्यात आले असून एकाच परिवारात 6 परवाने देण्याच्या शासकीय नियम -धोरणांवर प्रश्नचिह्न उभा होत आहे.व या मनमानी पद्धतीने शासकीय बंदूक परवाने वाटपावर अधिक चौकशी केली जावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.हे  विनाकारण बंदूक बागळने सामाजिक हिताच्या दृष्टीकोनातून धोकादायक असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे. 

बल्लारपूर शहरातील सुभाष वॉर्ड येथे मंगळवारी, 28 एप्रिल रोजी कॊटुंबिक विवादातून मुलचंद द्विवेदी (45)यांनी आपल्या परवाणीकृत बंदुकीने आपल्याच दोन मुले व पुतण्यावर बंदुकीने गोळी झाडात आत्महत्या केली. यात त्यांच्या दोन्ही मुलांना गोळी लागली तर पुतण्या वार चुकविण्यास यशस्वी होऊन ती गोळी भिंतीवर लागली. 

या गोळीबारात स्वतः मुलचंद  द्विवेदी व त्यांचा एक मुलगा मृत्यू पावला असून दुसऱ्या मुलाला तात्काळ नागपूर येथे हलविण्यात आल्याने उपचारानंतर आता त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. परंतु अजूनही पोलीस चौकशीत या हत्याकांडाचे कोणतेही नेमके कारण समोर आले नसून स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी व पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील जाधव यांनी, ठाणेदार एस. एस. भगत यांनी घटनास्थळाची जाऊन पाहणी करत चौकशी केली.

या घटनेमागचे कोणतेही कारण समोर आले नाही परंतु द्विवेदी परिवाराच्या कथनानुसार नागपूर च्या एका बँकेत सुरक्षा गार्ड म्हनुन कॅश डिलिव्हरी चे काम करणारे मुलचंद मागील आठवड्याभरापासून तणावग्रस्त होते.तरीही तणावग्रस्त व्यक्ती असे कृत्य करणे शक्य नाही. द्विवेदी परिवाराच्या कॊटुंबिक डॉक्टर असलेल्या बल्लापूरातील एका नामांकित डॉक्टरांचे मुलचंद नॉर्मल स्तिथीत होता असे म्हणणे आहे. शेजाऱ्यांमध्ये द्विवेदी परिवारातून भांडणाचे आवाज गेल्या काही दिवसापासून येत होते अशी कुजबुज आहे. 


मृतक मुलचंद द्विवेदी यांचा परिवार तीन ठिकाणी विखुरलेला असून पत्नी व मोठा मुलगा उत्तर प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी बांदा येथे राहतात तर दोन मुले भावाकडे अनेक वर्षांपासून बल्लारपूर येथेच राहत असून ते स्वतः नागपूर येथे नोकरी करतात परंतु,कोणत्याही पारिवारिक भांडण-तंट्याची परिस्थिती नव्हती असे कुटुंबाचे म्हणणे आहे.