गडचांदूर पोलिसांना इंजिनिअर ने केली बॅटने मारहाण : कॉन्स्टेबल गंभीर जखमी -उपचारार्थ चंद्रपूर हलविले #attack on maharashtra police - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गडचांदूर पोलिसांना इंजिनिअर ने केली बॅटने मारहाण : कॉन्स्टेबल गंभीर जखमी -उपचारार्थ चंद्रपूर हलविले #attack on maharashtra police

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:गडचांदूर-

 -
विडिओ : चव्हाण कुटुंबीय पोलिसांना मारहाण करताना 

संपूर्ण देशात लॉकडाऊन असून चंद्रपूर जिल्ह्यात देखील संचारबंदी असताना गडचांदूर शहरातील सरण सॉ मिल समोरील ग्राउंडवर क्रिकेट खेळणाऱ्या युवकांना पोलिसांनी हटकले असता क्रिकेट खेळणाऱ्या एका शासकीय नोकरीत असणाऱ्या इंजिनिअर व त्याच्या परिवाराने पोलिसांवर बॅट व स्टम्प ने हमला केला असता एक पोलीस कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाला असून उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे.सविस्तर माहिती नुसार आज दिनांक 19 एप्रिल दुपारी 12 वाजताच्या दरम्यान गडचांदूर पोलीस कॉन्स्टेबल तिरुपती माने व रोहित चिडगिरे शहरात गस्तीवर असताना सरण सॉ मिल समोरील ग्राउंडवर काही युवक क्रिकेट खेळताना आढळले. पोलिसांनी यांना संचारबंदी असून क्रिकेट खेळण्यास मनाई करत घरी जाण्यास सांगितले असता खेळत असलेला इंजिनिअर अविनाश चव्हाण अचानक पोलिसांशी वाद घालून शिवीगाळ करायला लागला. 

त्यानंतर चव्हाण याने धक्काबुक्की करत कॉन्स्टेबल तिरुपती माने यांच्या डोक्यावर बॅटने हमला केल्याने ते गंभीर जखमी झाले असतानाही परत उपस्थित दुसरे कॉन्स्टेबल रोहित चिडगिरे यांच्यावर क्रिकेट स्टम्प ने हमला करून जखमी  केल्याची माहिती आहे.

गंभीर जखमी तिरुपती माने यांना प्रथम ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथे दाखल केले असता त्यांना तात्काळ चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले व रोहित चिडगिरे यांना सुद्धा प्रथमोपचार करून चंद्रपूर ला हलविण्यात आले.

या गंभीर प्रकरणी मारहाण करणारे इंजिनिअर अविनाश चव्हाण व इतर सहा आरोपींना ताब्यात घेतले असून वृत्त  लिहेस्तव गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून  उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गोपाल भारती अधिक तपास करीत आहेत. 
या प्रकरणातील मारहाण करणारा मुख्य आरोपी राजुरा येथे जलसंधारण या शासकीय विभागात जुनिअर इंजिनिअर पदी कार्यरत असून त्याचे वडील मारोती चव्हाण सुद्धा वनसडी जिल्हा परिषद शाळेत मुख्यध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
  
पोलिसांवरील या हमल्याची शहरात सर्वत्र निंदा होत असून सुरु असलेल्या संकटकाळात सुशिक्षित म्हणाल्या जाणाऱ्या लोकांकडून अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलीस विभागवार शुल्लक कारणावरून हमला करणाऱ्या आरोपीवर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली जात असून टीम खबरकट्टा सुद्धा या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आहे.