सांगोडा (कारवाई ) येथे अवैध रेती तस्करी करताना दोन ट्रॅक्टर जप्त : आज रात्री 8 वाजता गावकऱ्यांच्या सतर्कतेने घटना उघडकीस : चालक मालक फरार -दोन ट्रॅक्टर जप्त #korpana - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सांगोडा (कारवाई ) येथे अवैध रेती तस्करी करताना दोन ट्रॅक्टर जप्त : आज रात्री 8 वाजता गावकऱ्यांच्या सतर्कतेने घटना उघडकीस : चालक मालक फरार -दोन ट्रॅक्टर जप्त #korpana

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -


कोरपना तालुक्यातील सांगोडा -कारवाई गावानजीक असलेल्या वर्धा नदीपात्रातून अवैध रेती तस्करी करताना कारवाई येथील घाटावर आगलावे यांच्या शेतातून रस्ता काढून रात्रीची तस्करी करताना सांगोडा गावकऱ्यांच्या सतर्कतेने आज रात्री 8 वाजताच्या दरम्यान दोन रेती ट्रॅक्टर पकडण्यात आले.गावकऱ्यांनी या अवैध वाहतुकीवर धाबा धरताच चालक -मालक फरार झाले. 

सांगोडा -कारवाई गावकऱ्यांनी सदर प्रकाराची माहिती देताच टीम  खबरकट्टा तर्फे कोरपना तहसीलदार, गडचांदूर ठाणे यांना संपर्क साधताच  मंडळ अधिकारी श्री. चव्हाण तात्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून दोन ट्रॅक्टर मालासहित जप्त करून वृत्त लिहेपर्यंत गडचांदूर पोलीस ठाणे येथे रवाना झाले असून घटनास्थळी सांगोडा, कारवाई पोलीस पाटील पाचभाई यांच्यासमेत अनेक गावकरी उपस्थित होते.

विषेश म्हणजे याच घाटावर 2महिन्यापूर्वी अवैध रेती तस्करीची विडिओग्राफी घेण्यास गेले असता पत्रकारांवर हमला करण्यात आल्यानंतर हे घाट तहसीलदारांनी सील केले होते तरीही लगेच 3-4 दिवसात त्याच ठिकाणून पुन्हा परिसरातील 7-8ट्रॅक्टर मालकांनी रेती तस्करी सुरु केल्याची तक्रार होती.


आता या घाटावर काय प्रतिबंध लावण्यात येतील याकडे समस्त कारवाई येथील  त्रस्त गावकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.