चंद्रपुरातील 7 हजार दिव्यांगांना मिळेल आर्थिक मदत #zpchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपुरातील 7 हजार दिव्यांगांना मिळेल आर्थिक मदत #zpchandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह जिल्ह्यात संचारबंदी कायम असून, ताळेबंदी करण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यांगबांधव आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा परिषद सरसावली आहे. 

जिल्ह्यातील 7 हजार दिव्यांगबांधवांना आर्थिक मदत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय जिपच्या समाजकल्याण विभागाने घेतला आहे. एकूण उत्पन्नातील 5 टक्के निधी दिव्यांगांच्या मदतीसाठी खर्च करावा, असे निर्देशही जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना दिल्याची माहिती समाजकल्याण सभापती नागराज गेडाम यांनी दिली आहे.

जिल्ह्यात ताळेबंदी असल्यामुळे काही दिव्यांगांच्या छोट्या व्यवसायावर अवकळा आली आहे. त्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्ह्यातील जवळपास 7 हजार दिव्यांगांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा केली जाणार असून, ती 500 रूपये असणार आहे. संकटकाळात जिल्ह्यातील दिव्यांगांच्या खात्यावर तब्बल 35 लाख रूपये खर्च होणार आहेत.


गावातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने दिव्यांगबांधवांचे बँक खाते, आधार कार्ड जमा करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. तर संबंधित ग्राम पंचायत एकूण उत्पन्नाच्या 5 टक्के निधी दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी तात्काळ खर्च करणार आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.