रुग्णवाहिकेच्या चालकाचा प्रताप -नागपूरहुन विनापरवागी आणले वेकोलि कर्मचाऱ्यांच्या मुलांना : दोन वेगवेगळ्या घटनेत 7 लोकांवर गुन्हा दाखल #lockdown - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रुग्णवाहिकेच्या चालकाचा प्रताप -नागपूरहुन विनापरवागी आणले वेकोलि कर्मचाऱ्यांच्या मुलांना : दोन वेगवेगळ्या घटनेत 7 लोकांवर गुन्हा दाखल #lockdown

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :घुग्गुस प्रतिनिधी -

आपल्या दोन मुलांना नागपूरवरून वेकोलिच्या केंद्रीय राजीव रतन दवाखान्याच्या रुग्णवाहिकेत घुग्घुस येथील राजीवरतन कामगार वसाहतमध्ये सोमवारी रात्री आणल्याची घटना उघडकीस आली. त्यांना रुग्णवाहिकेच्या चालकासह रात्री, तर मंगळवारी दुपारी 3 लोकांना  अश्या एकूण 7 लोकांविरुद्ध घुग्घूस पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करून विलिनीकरणासाठी चंद्रपूरला पाठविण्यात आले आहे.

वेकोलिच्या केंद्रीय राजीव रतन चिकित्सालयाची रुग्णवाहिका सोमवारी औषधी आणण्यासाठी चालक व चिकित्सालयात कार्यरत कर्मचारी हे नागपूरला गेले व परतीच्या प्रवासात त्यांनी नागपूरमध्ये शिक्षणासाठी असलेला मुलगा व मुलगी यांना घेऊन रात्री राजीव रतन कामगार वसाहतीत पोहचले. ही बाब पोलिसांना कळताच चालक दीपक लक्ष्मण कुमार याला ताब्यात घेतले व विलगिकरणासाठी चंद्रपूरला पाठविण्यात आले.
 
Add caption

दरम्यान, मंगळवारी आपल्या वाहनाने रोशन सुरेश बरादिया व त्याची पत्नी आणि भगत असे तिन्ही लोक विना परवानगी नागपूरवरून घुग्घुसमध्ये आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दोन वेगवेगळ्या घटनेत 7 लोकांविरुद्ध पोलिसांनी 269, 270, 271, 188(3) कलमान्वये गुन्हा दाखल केला.