तात्काळ लक्ष द्या : चंद्रपूर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांचे व्यापाऱ्यांना तात्काळ प्रभावी आदेश : 7 एप्रिल 2020 - #lockdown - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

तात्काळ लक्ष द्या : चंद्रपूर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांचे व्यापाऱ्यांना तात्काळ प्रभावी आदेश : 7 एप्रिल 2020 - #lockdown

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :  जाहीर सूचना -

जिल्हाधिकारी चंद्रपूर आदेशान्वये, चंद्रपूर जिल्हयातील जिवनावश्यक वस्तु विक्री व वितरण (भाजीपाला किराणा सामान/ दुध/ ब्रेड/ फळे/ अंडी/मांस/ मत्स्य/ बेकरी/ पशु खाद्यांची दुकाने/ इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रीकल्स गुडस/स्टेशनरी व जनरल गुडस/ हार्डवेअर/ कापड दुकाने व लाँड्री) इत्यादी प्रकारच्या सर्व आस्थापना/ दुकाने दिनांक 07.04.2020 ते दिनांक 14.04.2020 या कालावधीत आदेशान्वये ठरवुन देण्यात आलेल्या दिवशी, वेळेत सुरु ठेवण्याकरिता काही शर्ती व अटीवर परवानगी प्रदान करण्यात आलेली होती.

परंतु नागरीकांकडून अनावश्यक गर्दी होत असल्याने सामाजिक अंतर (Social Distancing) काटेकोरपणे पालन होत नसल्याने या आदेशात पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

1. जिवनावश्यक वस्तु विक्री व वितरण जसे भाजीपाला/किराणा सामान/दुध/ब्रेड/फळे/ अंडी/मांस/मत्स्य/बेकरी/पशु खाद्यांची दुकाने) या सर्व आस्थापना/दुकाने दररोज सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 या वेळेत सुरु राहतील.

परंतु या आदेशातील अ. क्र. 2 ते 5 :

2. इलेक्ट्रीकल्स व इलेक्ट्रॉनिक्स गुडस व मोबाईल विक्री/वितरण व दुरुस्ती इत्यादी आस्थापना/ दुकाने,

3. स्टेशनरी व जनरल गुडस वस्तु विक्री व वितरण इत्यादी आस्थापना/दुकाने.

4. हार्डवेअर संबधीत वस्तु विक्री व वितरण इत्यादी आस्थापना/दुकाने.

5. कापड दुकाने वस्तु विक्री व वितरण तसेच लाँड्री इत्यादी आस्थापना/दुकाने.

सुरु करण्यासाठी नेमुन दिलेले दिवस व वेळ याव्दारे तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येत आहे.