एकाच परिवारातील 6 गुरांचे गोठे जाळून खाक : जाणवारांसहित,दहा क्विंटल कापूस, मोटारसायकल, संपूर्ण शिवारफाटा जळाल्या : शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान #houseonfire - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

एकाच परिवारातील 6 गुरांचे गोठे जाळून खाक : जाणवारांसहित,दहा क्विंटल कापूस, मोटारसायकल, संपूर्ण शिवारफाटा जळाल्या : शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान #houseonfire

Share This


खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना प्रतिनिधी -

 तालुक्यातील धोपटाळा येथील गावातील घरांना लागून असलेल्या एकाच परिवारा च्या मालकीच्या सहा गोठ्याना अचानक भीषण आग लागली. त्यात मोठे नुकसान झाले. ही घटना सोमवार ला सकाळी दहा वाजता च्या सुमारास घडली.


खबरकट्टा ला प्राप्त माहितीनुसार , धोपटाळा येथील मुरलीधर केशव बोबडे, मनोहर केशव बोबडे, दशरथ अर्जुन बोबडे, दिवाकर विठ्ठल बोबडे, महादेव विठ्ठल बोबडे, विजय अर्जुन बोबडे यांचे मालकीचे  घराजवळ एकमेकाला लागून एकाच परिवारातील सहा जनावरांचे गोठे आहे.

यात लागलेल्या अचानक रित्या आगीत 

◾️ मुरलीधर बोबडे यांचे एक गायीचे वासरू, दोन बकऱ्या, जनावरांचा चारा, शिवार फाटा , 

◾️मनोहर बोबडे यांचे एक म्हशीचे पिल्लू, दोन बकऱ्या, जनावरांचा चारा, शिवार फाटा,

◾️दशरथ बोबडे यांचे बारा किंटल कापूस, शिवार फाटा, जनावरांचा चारा, दोन बकऱ्या, दोन मोटर सायकल, प्लास्टिक ड्रम, 

◾️दिवाकर बोबडे यांचे शिवार फाटा, एक गाय वासरू, दोन सायकली, दहा क्विंटल कापूस, जनावरांचा चारा,दोन प्लास्टिक ड्रम, 

◾️महादेव बोबडे यांचे दोन प्लास्टिक ड्रम, दरवाजा, पाच क्विंटल कापूस, 

◾️विजय बोबडे यांचे एक सायकल, दोन बकऱ्या, शिवार फाटा, 12 क्विंटल कापूस, जनावरांचा चारा, प्लास्टिक ड्रम, चार कोंबड्या जळून खाक झाल्या.


त्यामुळे या सहा ही शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले गेले आहे. लागलेली आग अल्ट्रा टेक , माणिकगड , राजुरा नगर परिषद च्या अग्निशामन दलाला पाचारण करून विझविण्यात आली. 


सदर घटनेचा पंचनामा मंडळ अधिकारी पचारे यांचे मार्गदर्शनाखाली तलाठी दिलीप देठे , हरिचंद्र अहिरकर,अरुण विधाते यांनी केला. यावेळी ठाणेदार अरुण गुरणुले, कातलाबोडी चे उपसरपंच विलास राऊत , ग्रामसेवक पोरा उपस्थित होते.