शिक्षक सेनेच्या माध्यमातून सेंट मायकल स्कूल चंद्रपूर कडून मुख्यमंत्री सहायता निधी ला 51764 रु. दान #CMRELIEFFUND - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शिक्षक सेनेच्या माध्यमातून सेंट मायकल स्कूल चंद्रपूर कडून मुख्यमंत्री सहायता निधी ला 51764 रु. दान #CMRELIEFFUND

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : शिक्षक आणि डॉक्टर यांना कुठल्याही समाजात सर्वोच्च स्थान दिला जातो. आणि या दोघांना घडविणारे म्हणजे शाळा हे कुठल्याही मंदिर, मस्जिद आणि चर्च इतकेच पवित्र समझले जातात.

आज मानवता वाचविण्यासाठी डॉक्टर्स आणि शिक्षक आपल्या परीने अदृश्य शत्रूशी थेट रस्त्यावर उतरून युद्ध लढत असताना चंद्रपूरची एक शाळा सेंट मायकल स्कूल आणि तिथल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी एक आदर्श स्थापित केला आहे. सेंट मायकल स्कूल च्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी प्रिंसिपल विकास कोल्हेकर सर च्या माध्यमातून आज दि. 13 एप्रिल 2020 ला स्वेच्छेने आपला एक दिवसाचा पगार वैश्विक महामारीशी लढण्याकरिता मुख्यमंत्री राहत कोष साठी स्थानिक जिल्हाधिकारी श्री कुणाल खेमणार यांना 51764/- रुपयाचा धनादेश देऊन दान केला.

जिल्हाधिकारी श्री खेमणार यांनी सेंट मायकल शाळेची प्रशंसा करत वक्तव्य केले की खाजगी शाळेत शिक्षकांचा व कर्मचाऱ्यांचा पगार कमी असतो तरी त्यांनी स्वइच्छेने आपला एका दिवसाचा पगार दान केला हे कौतुकास्पद आहे आणि यांचा हा आदर्श घेऊन अनेक शाळा, कॉलेज व इतर शैक्षणिक संस्था पुढे येऊन जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्र साठी आपापल्या परीने योगदान देतील अशी ही आशा त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रात मा. मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे हे प्रशासकीय अनुभव नसतांना सुद्धा आपल्या प्रदेश वासीयांचे कोरोना पासून जीव वाचविण्यासाठी स्वतःचा जीव लावून खूप संयमाने आणि परिपक्वतेने कार्य करीत आहे, तसेच चंद्रपूर चे जिल्हाधिकारी श्री कुणाल खेमणार यांनी उत्कृष्ठ प्रकारे चंद्रपूरात सुरक्षेचे व्यवस्थापन केले आहे, म्हणून आमच्या शाळेने शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री राजेश नायडू च्या माध्यमातून मुख्यमंत्री राहत कोष साठी मा. जिल्हाधिकारी यांना ही राशी देण्याचा निर्णय घेतला असे मनोगत सेंट मायकल शाळेचे प्राचार्य श्री विकास कोल्हेकर सर यांनी यावेळी व्यक्त केले. 

तसेच लोकडाऊन मध्ये लोकांनी प्रशासनाला योग्य सहकार्य करावा, गरजूंना मदत करावी आणि जास्तीतजास्त शाळांनी व कॉलेजने आपल्या जिल्हा व राज्यासाठी दान करावा असे आव्हान शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश नायडू यांनी केले.