संचारबंदीत अंगणवाडी पर्यवेक्षिका पौर्णिमा राठोड यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ ::घेतली 50 अंगणवाडी सेविकांची सभा :प्रकल्प अधिकाऱ्यांची कारणे दाखवा नोटीस : जिल्हा परीषद कार्यकारी अधिकारी काय कार्यवाही करतील -लक्ष लागून #LOCKDOWN - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

संचारबंदीत अंगणवाडी पर्यवेक्षिका पौर्णिमा राठोड यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ ::घेतली 50 अंगणवाडी सेविकांची सभा :प्रकल्प अधिकाऱ्यांची कारणे दाखवा नोटीस : जिल्हा परीषद कार्यकारी अधिकारी काय कार्यवाही करतील -लक्ष लागून #LOCKDOWN

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :चिमूर (शंकरपूर) -चिमूर पंचायत समिती अंतर्गत शंकरपूर येथे संचारबंदी असताना शंकरपूर व किटाळी सर्कलच्या अंगणवाडी पर्यवेक्षिकेने सभा घेतल्याचे उघडकीस आले असून जिलाधिकाऱ्यांच्या जमाव, सभा, मेळावे, गर्दी बंदी आदेशाला हरताळ फासण्यात आले आहे.

सविस्तर माहिती नुसार शंकरपूर व किटाळी सर्कलच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका पौर्णिमा राठोड यांनी शासनाचे नियम धाब्यावर बसवून केंद्रात 31मार्च मंगळवारी अंगणवाडी सेविकाची सभा घेतली. राठोड यांच्याकडे शंकरपूर व किटाडी या दोन सर्कलचा पदभार असून ५० अंगणवाडी केंद्र येतात.या सर्कल मधील अनेक अंगणवाडी सेविका यात उपस्थित होत्या असून या सभेचे नेमके कारण समोर आले नसून जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदी चे आदेश असताना कोणाच्या परवानगी ने ही सभा घेण्यात आली हे सुद्धा गुपित आहे.

या प्रकारची माहिती होताच प्रशासनाने लगेच 1 एप्रिल ला  पर्यवेक्षिका पौर्णिमा राठोड यांना सभेसंबंधात कारणे दाखवा नोटीस दिला आहे. तसेच  या गंभीर प्रकारची तात्काळ माहिती जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास अधिकारी श्री. संजय जोल्हे यांना दिली असून त्यांनी सुद्धा सदर पर्यवेक्षिकेस नोटीस बजावली असून पुढील कार्यवाही वरिष्ठ करतील असे गेडाम मॅडम, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती चिमूर यांनी टीम खबरकट्टा ला दिली आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण -

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता संकटावर मात करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे तालुकास्तरावर प्रशिक्षण सुरू आहे. या प्रशिक्षणात आशा वर्करपासून तर आरोग्य उपकेंद्रात प्राथमिक केंद्रांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.