अबब ! तासाभरात 470 वाहनधारकांवर बडगा, 100 गाड्या जप्त -तरीही विनाकारण फिरणारे आवरेना(Chandrapur police action Vehicle on road) - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अबब ! तासाभरात 470 वाहनधारकांवर बडगा, 100 गाड्या जप्त -तरीही विनाकारण फिरणारे आवरेना(Chandrapur police action Vehicle on road)

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर -1 एप्रिल 2020 -थोडक्यात


आजपासून (1 एप्रिल) जिल्हाधिकाऱ्यांनी शहरांच्या रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर वाहनधारकांवर जप्ती आणि दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश  दिले आहेत.मात्र तरीही काही नागरिक कारवाईचा इशारा देऊनही रस्त्यावर अकारण फिरत असतात.

त्यामुळे आजपासून (1 एप्रिल) जिल्हाधिकाऱ्यांनी शहरांच्या रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर वाहनधारकांवर जप्ती आणि दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी आदेशाची अंमलबजावणी सुरु केली.

यानंतर पोलिसांनी काही तासातच जवळपास 470 वाहनधारकांना दंड आकारला. तर 100 वाहने जप्त करण्यात आली. तसेच अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना वैध ओळखपत्र असल्यास सोडले जात आहे. तर हे ओळखपत्र नसलेल्या वाहनधारकाना दंड केला जात आहे.