चंद्रपुरात पारा 41.6 अंशावर #Chandrapur temperature at 41degree - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपुरात पारा 41.6 अंशावर #Chandrapur temperature at 41degree

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 16 एप्रिल -

एप्रिल महिना लागताच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. सुर्याचा पारा बुधवारी 41.6 अंशापर्यंत गेला. यंदा मार्च महिन्यात अवकाळी पावसाने आगमन झाल्याने उन्हाचे चटके उशिराने जाणवले. त्यातच कोरोना विषाणूमुळे संचारबंदी व टाळेबंदी असल्यामुळे नागरिक घरात राहात आहेत. त्यामुळे नागरिकांना अद्यापही चटके जाणवले नाहीत. पण, अत्यावश्यक सेवा देणार्‍यांना मात्र चटके सहन करावे लागत आहे.

विदर्भासह देशभरात चंद्रपूर उष्ण शहर म्हणून ओळखले जाते. मे महिन्यात या शहराचा पारा 45 ते 46 अंशापर्यंत जातो. यंदा मार्च महिन्यात अधूनमधून अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे मार्चमध्ये गारवा जाणवत होता. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कमी-अधिक प्रमाणात उन्ह तापू लागले. त्यातच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन-प्रशासनाने संचारबंदी लागू करून टाळेबंदी घोषित केली. 


ही टाळेबंदी सद्या 3 मे पर्यंत राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना घरातच बसावे लागेल. घरातही उष्ण वातावरण असल्यामुळे अडगळीत पडलेले कुलर्स नागरिकांना बाहेर काढले आहेत. यंदा उशिराने नागरिकांच्या कुलर्स लागले. 


महानगरातील रस्त्यांवर दरवर्षी शितपेयांची दुकाने सजली असायची. पण, यंदा टाळेबंदी ही दुकाने ओस पडली असून, रस्त्यांवर शुकशुकाट पसरला आहे. त्यामुळे शितपेय व्यावसायिकांवर आर्थिक संकटही कोसळले आहे.

Chandrapur-s-temp-at-41-degree