37 बटालियनच्या वतीने भामरागड, धोंडराज येथील गरीब जनतेला फेसमाक्स, सेनिटायझर,हँडग्लोव्ज, वितरण.करोना:घराघरात केली जंतूनाशक फवारणी #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

37 बटालियनच्या वतीने भामरागड, धोंडराज येथील गरीब जनतेला फेसमाक्स, सेनिटायझर,हँडग्लोव्ज, वितरण.करोना:घराघरात केली जंतूनाशक फवारणी #COVID-19

Share This
खबरकट्टा / गडचिरोली-अहेरी -

प्राणहिता पोलिस कम्प अहेरी 37 बटालियनच्या वतीने बटालियन कमांडेन्ट श्रीराम मीना यांच्या मार्गदर्शनात, प्रभारी कमांडेन्ट श्रीराम रस मीना यांच्या नेतृत्वात भामरागड, धोंडराज येथील आदिवासी बहुल, अतिदुर्गम, अतिसंवेदनशील भागात गरीब लोकांना कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, आपल्या परिवाराची सुरक्षा करण्यासाठी फेस माक्स, सेनिटायझर, हँडग्लोव्ज चे वाटप करण्यात आले. 

शिवाय घरा-घरात जंतू नाशक फवारणी करण्यात आली. कोविड-19 ची लागण रोखण्यासाठी विशेष मार्गदर्शन करून करोना संदर्भात माहिती देण्यात आली. 
   
याप्रसंगी 37 बटालियन सी. आर. पी. एफ. चे श्री संतोष भोसले, सहायक कमांडेन्ट सुबेदार मेजर भुपेष कुमार झोडे, निरीक्षक दिनेश सिंह सह 37 बटालियनचे सर्व अधिकरी उपस्थित होते.