गोंडराणी हिराई 352 वी जयंतीनिमित्य विनम्र अभिवादन#ranihirai - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गोंडराणी हिराई 352 वी जयंतीनिमित्य विनम्र अभिवादन#ranihirai

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : जिवती - संतोष इंद्राळे 


मुलनिवासी एकता संघर्ष समिती जिवतीच्या वतीने चंद्रपुर नगरीची शिल्पकार गोडवंशीय राणी हिराई यांच्या ३५२ व्या जयंतीनिमित्य विनम्र अभिवादन करण्यात आले.


बल्लारपूर व चंद्रपूर क्षेत्रात एकूण २३ गोंडवंशीय राजे होऊन गेलेत. त्यात राणी हिराई ही एकमात्र महिला शासक! राणी हिराईचे माहेर मध्यप्रदेशातील मदनापूरचे, तिचे वडील सरदार. त्यामुळे राजकारण आणि युद्ध कलेचे धडे बालपणापासूनच तिला मिळाले. वीरशहा गादीवर बसला. हिराईचा त्याच्याशी विवाह झाला. शूरवीर वीरशहाने आपली कारकीर्द गाजविली. त्याची हत्या झाली. या दाम्पत्याला मूल नसल्याने विधवा हिराईने आपल्या नात्यातील सहा वर्षे वयाच्या मुलाला दत्तक घेउन त्याला गादीवर बसविले व ती राज्य कारभार बघू लागली. राणीने राज्याचे कुशलपणे नेतृत्व केले. लहानग्या रामशहाला संस्कारित केले. शत्रूंनी राज्यावर स्वारी केली. 

त्यांना तिने धाडसाने उत्तर दिले. राणी स्वत: रणांगणावर उतरली. प्रजेचे हित जोपासत उत्कृष्ट बांधकाम, शिक्षण याकडे लक्ष देउन राज्याचा सर्वांगीण विकास केला. राज्यावर औरंगजेबाचा अमल होता. तरीही राणीने राज्यात गोहत्या बंदी केली. अंचलेश्वर मंदिर तसेच महाकाली देवीचे भव्य व देखणे मंदिर बांधले. पती निधनानंतर राणी डगमगली नाही. पतीचे स्वप्न तिने खंबीरपणे उभे राहून पूर्ण केले. वीरशहा आणि हिराई या दाम्पत्यांनी उत्तम राज्यकर्ते म्हणून आपली कारकीर्द गाजवले.


राणी हिराई एक महान विरागंणा महीला होती,तिने आपल्या बुध्दीमत्ता,कौशल्यांनी राज्यात उद्भवलेल्या बंडखोरांचा अंत केला,शत्रुवर विजय मिळवू  शकतो पण घरा जवडच्या कुंटूबाशी कसे व्यवहार करावे ,ते शत्रु कसे बनतात हिच राणी हिराईची शहाणपणा आणि शहाणपणाचे कौशल्य होते. अशा महान राणीला जयंतिनिमित्य अभिवादन करताना यावेळी प्रा. लक्ष्मण मंगाम, अध्यक्ष मूळनिवासी एकता समिती जिवती, लिंगोराव सोयाम मुख्याध्यापक जि.प, कंटू कोटनाके जिल्हाध्यक्ष, आदिवासी विद्यार्थी संघ, संजू मडावी, युवा कार्यकर्ता, प्रकाश कोटनाके, रवी मेश्राम, विलास आत्राम, भाग्यश्री एल.मंगाम, आदी उपस्थित होते.