भुरकुंडा येथील रास्त धान्य दुकानदार देवराव आदे यांची 35 ऐवजी 30किलोच धान्य देत असल्याची कबुली पुरवठा विभागाची कालच झाली होती सील कार्यवाही : शिधा पत्रिका धारकांना खोटे बयान देऊं वाचविण्याची आदे ची विनवणी : प्रकरणावर बोलण्यास तालुका पुरवठा अधिकारी सविता गंभीरे यांची टाळाटाळ : काळाबाजरीला अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याची गावकऱ्यांची शंका !#rashancard - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भुरकुंडा येथील रास्त धान्य दुकानदार देवराव आदे यांची 35 ऐवजी 30किलोच धान्य देत असल्याची कबुली पुरवठा विभागाची कालच झाली होती सील कार्यवाही : शिधा पत्रिका धारकांना खोटे बयान देऊं वाचविण्याची आदे ची विनवणी : प्रकरणावर बोलण्यास तालुका पुरवठा अधिकारी सविता गंभीरे यांची टाळाटाळ : काळाबाजरीला अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याची गावकऱ्यांची शंका !#rashancard

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :राजुरा -सरकारने तीन महिन्याचे धान्य देण्याची घोषणा केली. परंतु एकाचवेळेस एवढे धान्य दिल्यास त्यांचा विक्री वापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन नंतर निर्णय मागे घेत एक महिन्याचे धान्य उपलब्ध करून दिले. मात्र कार्डधारकांना १ महिन्याचे पर्याप्त धान्य सुद्धा उपलब्ध होत नसल्याचे दिसते आहे. कार्डधारकांना धान्याची पावती दिली जात नाही. धान्य कमी असल्याचा हवाला देत कमीच धान्य दिले जात आहे.तसेच दरिद्री रेषेखालील शिधापत्रिकांना महिन्याचे 35 किलो धान्य देण्याचा नियमही आहे. परंतु राजुरा तालुक्यातील भुरकुंडा येथील शिधापत्रिका धारकांना वेगळाच अनुभव येतो. गावातील सरकारी रास्त धान्य दुकानदार देवराव आदे हे 35 किलो ऐवजी कधी 15 तर कधी 20किलोच धान्य गरिबांना देत असल्याची गावकऱ्यांची अनेक दिवसांपासून तक्रार होती. 

सोबतच केसरी कार्ड धारकांना देवराव आदे धमकावून सरकारी किंमत 2-3रुपये डावलून चक्क 10 रुपये किलोने विकत घेण्यास भाग पडायचा. स्टॉक कमी असल्याचे सांगून कमीच धान्य दिले जात होते यात आणखी भर म्हणून धान्य फक्त दोनच दिवस प्रेत्येक महिन्याच्या 9 व 12 तारखेलाच वाटायचा त्यामुळे अनेकांची गैरसोय व्हायची. 

आता संपूर्ण देशात लॉकडाऊन असून अनेकांची कामे - रोजंदारी बंद आहेत अस्या स्थितीत गरिबांचे हाल होऊ नये म्हणून सरकाने प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ मोफत केले असतानाही यातही काळाबाजारी होत असल्याच्या घटना समोर आल्या असता भुरकुंडा गावातील सुजाण युवकांनी सदर दुकानदारावर कार्यवाही करण्याची तक्रार केली असता काल दिनांक 8 एप्रिल ला दुपारी पुरवठा विभागाने प्रत्यक्ष शिधापत्रिका धारकांचे बयान घेऊन दुकान सील केले. 


ऐका ऑडिओ : वरील विडिओ टच करून 

परंतु आज दिनांक 9 एप्रिल ला देवराव आदे यांनी गावातील अनेक शिधापत्रिका धारकांना आज होणाऱ्या फेरतपासणीत खोटे बयान देऊंन एक वेळ माफ करायची विनवणी करीत असल्याचे समाज माध्यमांवर वायरल अनेक ऑडिओ क्लिप्स मधून पुढे आले असून यात ते स्वतः 35 किलो ऐवजी 30 किलो धान्य देत असल्याचे मान्य करीत असून तालुका पुरवठा अधिकारी मॅडम आज येतील त्यांना चुकीचे बयान देण्यास प्रवृत्त करीत असल्याचे पुढे आल्याने आता नेमकी काय कार्यवाही होईल याकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. 

शिवाय आदे यांच्या दुकानाच्या ठिकाणी रास्त भाव दुकानाचा साधा फलक सुद्धा नसून दर महिन्यात होणाऱ्या शासकीय तपासणीत एकही पुरवठा विभागाचे कर्मचारी, दक्षता समिती चे पदाधिकाऱ्यांच्या हे ध्यानात कसे नाही आले हा गंभीर प्रश्न आहे. डोळ्याने दिसत असूनही हे नेमके इतक्या दिवसापासून काय करत होते . यांच्या नजरेस इतक्त्या दिवसापासून सुरु हा प्रकार दिसला नाही का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. 

दर महिन्यात कमी धान्य वितरित करून बाकी धान्य काळाबाजारीत विकले जाण्याची दाट शक्यता असून या संदर्भात तालुका पुरवठा अधिकारी सविता गंभीरे यांचा अभिप्राय टीम खबरकट्टा ने मागितला असता त्यांनी सदर भुरकुंडा प्रकरणावर अभिप्राय देण्याचे टाळले असून यात काळाबाजरीच्या शासकीय समर्थन आहे काय अशी शंका उपस्थित होत आहे. 

हा काळा बाजार करीत असतांना दुकानदार एकटा दोषी आहे का यात अधिकाऱ्यांचा हात असल्या शिवाय इतकी मोठी हिम्मत दुकानदार करतो तरी कशी ? जर शिधा पत्रिका धारकांना अंगठा लावल्या शिवाय धान्य मिळत नाही तर इतक्या मोठ्या प्रमाणावर धान्य काळ्या बाजारात कश्या पद्धतीने आदे लोकप्रतिनिधींना विकत होता ?? कुणाच्या आशीर्वादाने हा गोरख धंदा सुरु होता.याचा छडा लागलाच पाहिजे असे भुरकुंडा येथील नागरिकांचे म्हणणे आहे .