चंद्रपुरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 35 आरोपींना अटक : 215 वाहनेही जप्त : एकूण 4, 42, 400चा दंड वसूल #lockdown #chandrapurpolice - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपुरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 35 आरोपींना अटक : 215 वाहनेही जप्त : एकूण 4, 42, 400चा दंड वसूल #lockdown #chandrapurpolice

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषीत केला असुन कोरोना विषाणुचा प्रसार भारतात, संपुर्ण महाराष्ट्रात गतीने पसरत असल्याने चंद्रपूर जिल्हयात या कोरोना (Covid-19) विषाणु चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (३) अन्वये जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी संचारबंदी व लॉकडाउन आदेश निर्गमित केले होते. 

असे  असतांना सुध्दा बरेच नागरीक सदर संचारबंदी व लॉकडाउन आदेशाचे उल्लघंन करुन रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याचे आढळुन आल्याने दिनांक १९ मार्च, २०२० ते ०९ एप्रिल, २०२० पावेतो जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे संचारबंदी व लॉकडाउन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरूद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ अन्वये ९६ गुन्हे दाखल करण्यात आले असुन यामध्ये ३५ आरोपीतांना अटक, २१५ वाहने जप्त आणि एकुण ४,४२,४००/-रू दड वसुल करण्यात आला आहेत.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी चंद्रपूर जिल्हयातील सर्व नागरीकांना याद्वारे आवाहन केले आहे की, चंद्रपूर जिल्हयात कोरोना (Covid-19) विषाणु चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाद्वारे निर्गमित केलेल्या संचारबंदी व लॉकडाउन नागरीकांनी काटेकोरपणे पालन करावे. तसेच पोलीसांना सहकार्य करावे. संचारबंदी लॉकडाउन उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतांविरुध्द कठोर कायदेशीर कारवाई येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.