रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद : महिलांकडून उत्तम प्रतिसाद : तीन दाम्पत्या सहित 30 व्यक्तींनी केले रक्तदान #blood donation - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद : महिलांकडून उत्तम प्रतिसाद : तीन दाम्पत्या सहित 30 व्यक्तींनी केले रक्तदान #blood donation

Share This
खबरकट्टा / कोरपना : गडचांदूर -मयूर ऐकरे -


महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहिती नुसार महाराष्ट्रात फक्त तीन ते चार दिवस पुरेल इतकास रक्त साठा उपलब्ध आहे.ज्या प्रमानात कोरोना बाधित रुग्ण आहेत त्यांना रक्ताची गरज आहे एक माणुसकीच नातं म्हणून नेहमीच गडचांदूर शहरानी पुढाकार घेतला आहे मा ना  आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना विषाणू च्या वाढत्या पादुर्भावाने रक्तदान करणाऱ्या दात्यांची संख्या झपाट्याने घटली व रक्तपेढीत रक्ताचा  पुरेसा साठा उपलब्ध नाही तरी तरुणांनी रक्तदान करण्यास समोर यावे.

या त्यांच्या आव्हाना नंतर गडचांदूर येथील हेल्पिंग गडचांदूर मित्र परिवार  व चंद्रपुर रक्त संचलित पेढी  सामान्य रुग्णालय चंद्रपुर व नगर परिषद गडचांदूर  यांच्या सहकार्याने शुक्रवारी सकाळी ११ ते २ या वेळेत जिल्हा परिषद शाळा  येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात तरुण युवक व युवती यांचा उत्तम प्रतिसाद लाभला सोबतच तीन दाम्पत्य नी रक्तदान केले.

यात सगुणा रुपचंद लोनगाडगे, सुनीता प्रमोद बोन्डे व शेख या तीन दाम्पत्यांचा सहभाग होता ,या शिबिरात 30 व्यक्ती नि रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात योगदान दिले,रक्तदात्यांनी रक्तदान करून "एक व्यक्ती एक जीव" वाचविण्याचा संकल्प हेल्पिंग गडचांदूर मित्र परिवार चे सतिश बिडकर यांनी केला.

शिबिराच्या यशस्वी ते  साठी  ,विजय बानकर, महेश देरकर, महेश परचाके,सुनील आर्किलवार, प्रमोद मोहुर्ले, सपकाळ, रुपेश रोहणे, वैभव राव, अंजु शेख,  अंकित कुचंनकर सावन कोहळे  आशिष सोनवणे, यांनी मोलाचे परिश्रम घेतले.


" कोरोनाने नाही जाऊ देणार कोणाचा जीव "
आम्ही रक्तदान करून वाचवू सर्वांचे जीव "

हा संकल्प करून रक्तदात्यान मध्ये जागृती करण्यात आली व कोरोना विषाणू बाबत ची माहिती डॉ अमित पवार रक्त संचलित पेढी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांनी  दिली.

रक्तदान करण्यात आलेल्या रक्तदात्यांना फळे  बिस्कीट थंड पेय नगराध्यक्ष सुनीता टेकाम  यांच्या तर्फे वाटप केले , तसेच आरोग्य सभापती जयश्री ताकसांडे  यांच्या तर्फे सरबत वाटप करण्यात आले,सोबतच नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष सचिन भोयर यांनी माक्स वाटप केले.

हेल्पिंग गडचांदूर मित्र परिवार चे कार्य उल्लेखनीय असून रक्तदान करून अनोळखी रुग्णाला रक्त पुरवून रुग्णाचा जीव वाचवणे या पेक्षा  दुसरे  महान कार्य  नाही असे प्रतिपादन  नगर परिषदेच्या मुख्यधिकारी डॉ विशाखा शेळके यांनी केले.

सर्व पदाधिकारी समाज सेवक यांनी हेल्पिंग गडचांदूर मित्र परिवार  यांचे कार्य अतिषय प्रशंसनीय आहे हीच खरी सेवा आहे असे संबोधले असेच सामजिक कार्य नेहमी जोपासावी असे नागरिकांनी म्हटले.