चंद्रपुरात 243 वाहने जप्त, 102 जणांवर गुन्हे तर 5 लाखांचा दंड वसूल #lockdown - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपुरात 243 वाहने जप्त, 102 जणांवर गुन्हे तर 5 लाखांचा दंड वसूल #lockdown

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू असून, पूर्णतः टाळेबंदी आहे. तरीही काही नागरिक विनाकारण घराबाहेर फिरणार्‍यांच्या पोलिस प्रशासनाने मुसक्या आवळल्या आहेत. आतापर्यंत 243 वाहने जप्त करण्यात आले. 102 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, 5 लाखावर दंड ठोठावण्यात आला आहे नागरिकांनी पुढील काळात घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.


आता 14 एप्रिल ही मर्यादा वाढवून 30 एप्रिल पर्यंत राज्यात टाळेबंदी कायम राहणार आहे. यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन तयार असून, नागरिकांची कुठली ही गैर व्यवस्था होणार नाही. याबाबतच्या उपाययोजना करण्यात येत आहे. सद्या जिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही. त्यामुळे येणार्‍या काळात जिल्ह्यात येणारे प्रत्येक वाहन, प्रत्येक व्यक्ती तपासली जाईल व त्याचे निर्जंतुकीकरण केले जाईल. सोबतच सीमावर्ती भागांमध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी स्वतः दक्ष राहून बाहेरून येणार्‍या नागरिकांची माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

राज्य शासनाने 30 एप्रिल पर्यंत टाळेबंदी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या काळात आवश्यक असणारी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, अडकून पडलेल्या नागरिकांना निवारा, बेघर,निराश्रित व व विमनस्क लोकांना रोजचे भोजन, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था व आरोग्य यंत्रणाआणखी नियोजनबद्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


सद्या 28 नागरिकांची वैद्यकीय तपासणी झाली असून, त्यातील 26 लोकांचे नमुने घेण्यात आले आहे. त्यापैकी 25 नागरिकांचे नमुने निगेटिव्ह असून, 2 दोन नमुने प्रतीक्षेत आहे. आतापर्यंत विदेशातून परत आलेल्या बाहेर राज्यातून बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची संख्या 26 हजार 663 आहे. त्यापैकी 4 हजार 482 नागरिकांना होम कॉरेन्टाईन करण्यात आले आहे. तर यापैकी 22 हजार 181 लोकांनी 14 दिवस होम कॉरेन्टाईन राहण्याचा कालावधी पूर्ण केला आहे. 30 नागरिकांना इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आले.

जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेवर या काळामध्ये प्रचंड बंदोबस्ताचा तणाव आहे. पोलिस दलाला विविध ठिकाणी कर्तव्य पूर्तीसाठी जावे लागते. त्यांच्यासाठी एका निर्जंतुकीकरण वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे.


जिल्ह्यामध्ये सध्या 642 नागरिक विविध निवारा गृहामध्ये आश्रयास आहेत. त्यांना 30 एप्रिल पर्यंत राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अन्य राज्यात अडकलेल्या नागरिकांनी देखील या काळात आहे तिथेच राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.