ताडोबात सुशीला च्या कुटुंबात आला नवा पाहुणा : लॉकडाऊन मधेही तब्बल 2100 वन्यप्रेमींनी घेतले व्याघ्र दर्शन #tadoba #lockdown - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ताडोबात सुशीला च्या कुटुंबात आला नवा पाहुणा : लॉकडाऊन मधेही तब्बल 2100 वन्यप्रेमींनी घेतले व्याघ्र दर्शन #tadoba #lockdown

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ताडोबा -


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर टाळेबंदी आहे. ही टाळेबंदी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालाही लागू आहे. या टाळेबंदीतच ताडोबात नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. सुशीला नामक हत्तीनीने एका पिलाला मंगळवारी जन्म दिला. पिलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, सुशीला व पिल्लू सुखरूप आहे. 


ताडोब्याने या नव्या पाहुण्याचे स्वागतच केले आहे. सद्या हत्ती व पिलू मोहुर्ली येथे आहे. त्यांच्यावर निगराणी ठेवली जात असल्याची माहिती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वनाधिकारी एस. भागवत यांनी दिली.


कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी टाळेबंदी कायम असून, 31 मार्चपासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पही बंद आहे. व्याघ्र प्रकल्प 3 मे पर्यंत बंदच राहणार आहे. टाळेबंदीमुळे मार्चपासून व्याघ्र प्रकल्प बंद झाल्याने एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत पर्यटकांना व्याघ्र सफारीला मुकावे लागले. 


त्यामुळे निसर्ग व व्याघ्रप्रेमींचा हिरमोड झाला. यावर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एन.आर. प्रवीण यांनी तोडगा शोधून काढला आहे. टाळेबंदीतही वन्यजीवप्रेमींना व्याघ्र भ्रमंतीचा आनंद मिळावा, यासाठी असे ऑनलाईन व्याघ्र दर्शन सुरू केले आहे. त्याचा आनंद देशभरातील वन्यजीवप्रेमी घेत असून, पहिल्याच दिवशी 2 हजार 100 लोकांनी व्याघ्र दर्शन घेतले होते.