20 एप्रिल ला चंद्रपूर जिल्हांतर्गत संचारबंदी हटणार ?? ##COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

20 एप्रिल ला चंद्रपूर जिल्हांतर्गत संचारबंदी हटणार ?? ##COVID-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर -3मे पर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या टाळेबंदीत महाराष्ट्रातील जिल्ह्यांची कोविड -19 च्या रुग्णसंख्येनुसार रेड,यलो,ग्रीन झोन मध्ये वर्गवारी करण्यात आली असून ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण नाहीत अश्यांचा ग्रीन वर्गवारीत समावेश असून येत्या 20 एप्रिल पासून या जिल्ह्यांतर्गत संचारबंदी काही प्रमाणात शिथिल केल्या जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. 

चंद्रपूर जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नसून ग्रीन जिल्ह्यामध्ये समावेश आहे.त्याअनुषंगाने चंद्रपूर जिल्हा बंदी कायम ठेवत 20 एप्रिलपासून जिल्ह्यातील "संचारबंदी शिथिल" होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याशी चर्चा केली. झालेल्या चर्चेत जिल्ह्यातील बंद असलेले उद्योग सुरू करण्याची त्यांना विनंती केली असता जिल्ह्यातील उद्योग Covid19 चे सर्व नियम पाळून सुरू होण्याचे संकेत अजित पवार दिले असून लवकरच तसे आदेश निघणार आहेत, असा विश्वास राजेंद्र वैद्य यांनी फेसबूकवर दिलेल्या माहितीतून व्यक्त केला आहे.