20एप्रिल पासून बल्लारपूर पेपर मिल सुरु होणार : जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी :या टप्प्यात 500 जाणार कामावर #BGPPL - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

20एप्रिल पासून बल्लारपूर पेपर मिल सुरु होणार : जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी :या टप्प्यात 500 जाणार कामावर #BGPPL

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : थोडक्यात -
बल्लारपूर पेपर मिल 20 एप्रिलपासून सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली असून, कंपनीतील सातव्या क्रमांकाच्या पेपर मशीनकडून कागद उत्पादन त्याच दिवसापासून सुरू होईल, अशी माहिती बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे महासचिव वसंत मांढरे यांनी दिली आहे.


सुमारे 5 हजार कर्मचारी असलेले हे मोठे उद्योग लॉकडाऊनमुळे गेले अनेक दिवसांपासून बंद आहे. मात्र कोविड 19 च्या काही अटी कायम ठेवून जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी हा उद्योग सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या कागद उद्योगाच्या उत्पादन प्रक्रियेचा पहिला टप्पा बांबू कटिंग केला जाणारा चिप्पर विभाग गेल्या दोन दिवसांपासूनच सुरू झाला आहे. पुढील टप्प्यातील विभागाचे सुमारे 500 कर्मचारी कामावर येणार असल्याचे मांढरे यांनी सांगितले.