जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर द्वारे : 20 एप्रिल 2020 #Diochandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर द्वारे : 20 एप्रिल 2020 #Diochandrapur

Share This
जिल्ह्यातील सूट दिलेल्या संस्थांना ई-पास अनिवार्य; क्यूआर कोड देणार.

खबरकट्टा /चंद्रपूर,दि.20 एप्रिल: 

राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात दिनांक 20 एप्रिल 2020 रोजीपासून सूट दिलेल्या प्रवर्गात येणारे औद्योगिक आस्थापना, औद्योगिक वसाहती, बांधकाम आस्थापना (शासकीय व खासगी) यांचे संबंधातील अधिकारी,कर्मचारी यांना ई-पास अनिवार्य असून क्यूआर कोड असणारी ई-पास उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिलेल्या आदेशान्वये उपविभाग अंतर्गत असलेले औद्योगिक आस्थापना, औद्योगिक वसाहती, बांधकाम आस्थापना (शासकीय व खासगी) यांचे संबंधातील अधिकारी,कर्मचारी यांनी पासेस सुविधेची मागणी केल्यास त्यांना ई-पास परवानगी देण्यात यावी.

असा करावा अर्ज:

औद्योगिक आस्थापना, औद्योगिक वसाहती, बांधकाम आस्थापना (शासकीय व खासगी) यांचे संबंधातील अधिकारी,कर्मचारी यांनी गुगल प्ले स्टोअर वरून ई-पास चंद्रपूर या नावाचे ॲप डाऊनलोड करून ई-पाससाठी अर्ज करावेत.

अशी असणार प्रक्रिया:

संबंधित उपविभागीय अधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्र अंतर्गत औद्योगिक आस्थापना, औद्योगिक वसाहती, बांधकाम आस्थापना (शासकीय व खाजगी) यांचे संबंधातील अधिकारी,कर्मचारी यांना ई-पासेस निर्गमित करण्याकरिता स्वतंत्र लॉगिन आयडी व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानुसार उपविभागीय अधिकारी यांनी सदर लॉगिनमध्ये येणाऱ्या अर्जानुसार रीतसर परवानगी द्यावी. संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी ई-पास परवानगी देतांना संबंधित उपविभागीय पोलिस अधिकारी यांचेशी चर्चा करावी.

या मिळणार ई-पासच्या सुविधा:

उपविभागीय अधिकारी यांनी परवानगी दिल्यानंतर क्यूआर कोड जनरेटर होईल व संबंधित पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना गस्तीचे वेळी क्यूआर कोड स्कॅन करून क्यूआर कोडची खात्री करून तपासणी करता येईल.ई-पासची  परवानगी पीडीएफमध्ये सुद्धा डाउनलोड होत असल्याने त्यांची प्रिंट करून पोलिस अधिकाऱ्यांना आवश्यकतेप्रमाणे दाखविता येईल.