वर्धा ब्रेकिंग : गर्भवती आई ची 2मुलींसह आत्महत्या : आज दुपारची घटनाखुनाच्या पाठोपाठ आत्महत्येने हादरला जिल्हा :suicide #wardha - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वर्धा ब्रेकिंग : गर्भवती आई ची 2मुलींसह आत्महत्या : आज दुपारची घटनाखुनाच्या पाठोपाठ आत्महत्येने हादरला जिल्हा :suicide #wardha

Share This
खबरकट्टा / वर्धा /अल्लीपुर-नितीन सेलकर -


अल्लीपुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले खानगाव (गो.) येथे गर्भवती आईसह 2 मुलीची विहिरीत आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. 


खानगाव (गो.) या शिवारातील महेश रमेशराव ठाकरे यांच्या शेतात 3 दिवसापासून मुक्कामी असलेल्या मेंढपाळ परिवारातील गर्भवतीसह 2 चिमुकल्या मुलींची महेश ठाकरे यांच्या शेतालगत असलेल्या शेतवीहरित आत्महत्या झाल्याची मोठी दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण अल्लीपुर-कानगाव सर्कल मध्ये हाहाकार झालेला आहे.


मृतक निर्मला सुमित कुरवटकर वय 24 वर्ष असे गर्भवती आईचे नाव असून कु.राधिका सुमित कुरवटकर  वय 4 वर्ष, कु.काजल सुमित कुरवटकर वय 3 वर्ष, असे या चिमुकल्यांचे नाव आहे.मेंढपाळ हे रा.गंवडी (खर्डा) ता.बाभूळगाव जिल्हा:यवतमाळ येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश कामाले यांच्या मार्गदर्शनात पोलीस शिपाई त्र्यंबक मडावी,पोलीस शिपाई सतीश नैताम हे करत असून आत्महत्येचं गुढ अजूनपर्यंत उकलेलं नाही.