हातभट्टीच्या दारूची तस्करी - विरूर पोलिसांच्या धाडीत एकूण 2 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त : 6 आरोपी अटकेत #lockdown - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

हातभट्टीच्या दारूची तस्करी - विरूर पोलिसांच्या धाडीत एकूण 2 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त : 6 आरोपी अटकेत #lockdown

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा - विरूर स्टेशन -

सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आहे. यावर आळा बसावा म्हणून सर्वत्र संचारबंदी असून लॉकडाऊन सुरू आहे. अशाही परिस्थितीमध्ये दारूची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

लॉकडाऊनमध्ये दारुची तस्करी करणाऱ्या 6 जणांना विरुर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 3 वेगवेगळ्या कार्यवाहीत एकूण 2 लाख 43 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी संतोष राठोड (सुब्बई ), विनोद पुप्पलवार(सुब्बई ), संजय लोखंडे, श्रीधर कुरवटकर (श्रीरामपूर), प्रेम सातपुते(बल्लारपूर ),  आकाश भोयर(बल्लारपूर ) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

लॉकडाऊनमुळे राजुरा तालूक्यात होणारी दारूची तस्करी पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे तळीरामांचा गळा कोरडा पडला आहे. वाट्टेल त्या किंमतीत दारू खरेदी करण्यासाठी तळीरामांची धडपड सुरू आहे. याचाच फायदा काही अवैधरित्या हातभट्टीद्वारे दारू काढणारे घेत आहेत. या प्रकाराची माहिती विरूर पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकली. या कार्यवाहीत सुमारे 18 हजार रुपये किंमतीची 130 लीटर गावठी दारू आणि या कामी वापरण्यात आलेल्या 2 लाख 25 हजार रुपये किमतीच्या 3 दुचाकी, असा एकूण 2 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा तिवारी, उपनिरीक्षक सदानंद वडतकर, विजय तलांडे, प्रमोद मिलमीले, भगवान मुंडे,सुनील राऊत,  संघपाल गेडाम, अशोक मडावी, प्रल्हाद जाधव, माणिक वागदरकर, विजय मुंडे, पवार आणि कुलसंगे यांनी केली.