शिवभोजनात तक्रार आल्यास तात्काळ कार्यवाही होणार : जिल्ह्यात सुरु आहेत एकूण 16 शिवभोजन केंद्र : दररोज 3 हजार थाळी वितरण #shivbhojan thali - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शिवभोजनात तक्रार आल्यास तात्काळ कार्यवाही होणार : जिल्ह्यात सुरु आहेत एकूण 16 शिवभोजन केंद्र : दररोज 3 हजार थाळी वितरण #shivbhojan thali

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

राज्य शासनाच्या शिव भोजन योजने अंतर्गत जिल्ह्यात 16 ठिकाणी असाह्य, विमनस्क, निराधार, बेघर लोकांना तयार अन्नाचे वाटप केले जात आहे. उन्हाळ्यामध्ये चांगले अन्न देण्याबाबत शिव भोजन देणार्‍या कंत्राटदारांना बजावण्यात आले असून, तक्रार आल्यास कार्यवाही करण्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.



जिल्ह्यात सध्या चंद्रपूर येथे 6, वरोरा 2, भद्रावती बल्लारपूर मुल गोंडपिंपरी राजुरा, सावली, चिमूर, ब्रह्मपुरी या तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येकी एक असे एकूण 16 केंद्र आहेत.या ठिकाणावरून जवळपास 3 हजार थाळी केवळ 5 रुपये किमतीमध्ये दिल्या जाते.




थाळी 5 रुपयात विकली जात असली तरीही तिची शहरी भागात 50 तर ग्रामीण भागात 40रुपये मूळ किंमत असून 5रुपया व्यतिरिक्त चे अनुदान शासनातर्फे दिले जात असूनही काही ठिकाणी अन्न खराब दर्जाचे दिले जात असल्याची तक्रार असून पुरवठा अधिकाऱ्यांनी याकडे बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे.