पालकमंत्र्यांनी घेतली शिधापत्रिका नसलेल्या 14644 कुटुंबाची जबाबदारी #sunilkedar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पालकमंत्र्यांनी घेतली शिधापत्रिका नसलेल्या 14644 कुटुंबाची जबाबदारी #sunilkedar

Share This
खबरकट्टा / वर्धा जिल्हा प्रतिनिधी(उमंग शुक्ला)-7एप्रिल

देशात लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग व्यवसाय बंद आहेत.यात रोजमजुरी करणाऱ्या गरिबांची अवस्था अत्यंत नाजूक आहे. या गरिबांना दिलासा देण्यासाठी  शासनाने  अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत  सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील शिधापत्रिका धारकांना तीन महिने 5 किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. 

मात्र ज्यांच्याकडे राशन कार्डच  नाही पण त्यांना अन्नधान्याची आवश्यकता आहे अशा (14644 कुटुंब) 50 हजार  लोकांची जबाबदारी पालकमंत्री सुनील केदार यांनी उचललीय.

आज वर्धेच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार ,आमदार रणजित कांबळे, सर्व उपविभागीय अधिकारी आणि नगर परिषद मुख्याधिकारी उपस्थित होते.जिल्ह्याचे वर्धा , हिंगणघाट , आर्वी हे  तिन्ही उपविभाग मिळून 11875 कुटुंबाकडे शिधापत्रिका आहेत मात्र त्यांना अन्नधान्य मिळत नाही. यामध्ये 47991 लोकसंख्येचा समावेश आहे. ही  यादी शासनाकडे पाठवून ती दोन दिवसात मंजूर करून घेण्याचे निर्देश  जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिलेत. 
 


या 11 हजार 875 कुटुंबांना शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळणार आहे. याशिवाय शिधापत्रिका नसलेल्या मात्र अन्नधान्य ची आवश्यकता असणाऱ्या 14 हजार 644  कुटुंबाची जबाबदारी स्वतः पालकमंत्र्यांनी घेतली.

लवकरच या  कुटुंबांना अन्नधान्यासोबतच खाद्यतेल, साखर, हळद, तिखट, मीठ,अंघोळ व कपड्याचा साबण   इत्यादी जीवणावश्यक  साहित्याची किट देण्यात येईल. हे साहित्य  सर्व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे देण्यात येणार असून त्यांनी यादीप्रमाणे  हे साहित्य तलाठी, ग्रामसेवक यांच्यामाध्यमातून गरजू कुटुंबापर्यंत पोहचवली जाणार आहे.