चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने कोरोनाग्रस्तांसाठी 11 लाखांची मदत #cmrelieffund - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने कोरोनाग्रस्तांसाठी 11 लाखांची मदत #cmrelieffund

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर :

देशासह संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार उडाला आहे. प्रत्येक देश या आजारापासून बचाव करण्यासाठी धडपड करीत आहे. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. त्यामुळे या आजाराच्या प्रतिबंधासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. 

त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. यामुळे छोटे-मोठे सर्व उद्योगधंदे बंद पडले आहेत. कामगारांच्या हाताला काम नसल्याने उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यासाठी व कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य व जिल्हा प्रशासनास सहाय्यता निधीची मोठी गरज आहे. या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहे.

शेतकऱ्यांच्या नेहमीच मदतीला धावून जाणारे बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांच्या पुढाकाराने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्हाधिकारी सहाय्यता निधीस ११ लाख रुपयांचा धनादेश आज  जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना सुपूर्द करण्यात आला. बँकेच्या या मदतीसाठी जिल्हाधिकारी यांनी कौतुक केले असून यावेळी बँकेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दुबे, प्र. व्यवस्थापक श्री वानखेडे उपस्थित होते.