खडू गेला अन् दांडू हातात आला : राज्य सीमेवर शिक्षकांचा पहारा : 105 शिक्षक बनले पोलीस मित्र : तहसीलदारांचा अपुरी यंत्रांना भरून काढण्यासाठी शिक्षकांना आदेश #lockdown - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

खडू गेला अन् दांडू हातात आला : राज्य सीमेवर शिक्षकांचा पहारा : 105 शिक्षक बनले पोलीस मित्र : तहसीलदारांचा अपुरी यंत्रांना भरून काढण्यासाठी शिक्षकांना आदेश #lockdown

Share This


तहसीलदाराने शिक्षकांना केले सीमेवर उभं, हातात दिले दंडुके : जिवती  तहसीलदाराने काढला आदेश विद्यार्थ्यांना घडविणार्‍या शिक्षकांचा कोरोना विषाणूने चांगलाच चिमटा काढला आहे. लॉकडाउनमध्ये हातातील खडू गेला अन् चक्क दांडा शिक्षकांचा हाती आला आहे. जिवती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी काढलेल्या आदेशाने तालुवयातील १०५ शिक्षक महाराष्ट्र-तेलंगाणाचा सिमेवर खडा पहारा देत आहे.खबरकट्टा / चंद्रपूर : जिवती प्रतिनिधी - 

कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. सरकारकडून सर्व उपाययोजना करण्यात येत असल्या तरी कोरोनावर नियंत्रण मिळविणे कठीण झाले आहे. यामुळेच केंद्र सरकारकडून लॉकडाउन वाढविण्याचा विचार सुरू आहे. मात्र, याच कोरोनाने शिक्षकांच्या हातातील खडू हिसकावला आहे. त्याच्या हातात चवक दंडुका आल्या आहेत. 


हा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात पाहायला मिळत आहे. कोरोना विषाणूने धावणारे जग थांबले. देश टाळेबंद झाले. घरा बाहेर पडू नका, घरातच राहा अशा सूचना केंद्र आणि राज्य सरकारकडून वारंवार दिल्या जात आहेत. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष करीत विनाकारण घराबाहेर पडणार्‍यांमुळे पोलिसांची पर्यायाने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. 
लॉकडाउनची प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिस यंत्रणा दिवसरात्र करीत आहेत. पोलिस दलाची यंत्रणा अपुरी पडत असल्याने पोलिसांचा सोबतीला पोलिस मित्र उभे झाले आहेत. गृहविभागाची अपुरी पडलेली यंत्रणा भरून काढण्यासाठी जिवतीचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी एक आदेश काढला आहे. या आदेशानुसार शासकीय, निमशासकीय संस्थाच्या वर्ग तीनमधील कर्मचारी पोलिस मित्र म्हणून कार्य करणार आहेत. जिवती तालुक्यातील १०५ कर्मचार्‍यांची पोलिस मित्रासाठी नियुक्ती केली गेली आहेत. 

पोलिस मित्र म्हणून कार्य करणारे ते १०५ कर्मचारी सहाय्यक शिक्षक आहेत. जिवती तालुक्यातील टेकामांडवा, वणी बुजरुक, जिवती पोलिस ठाण्याअंतर्गत येणार्‍या महाराष्ट्र-तेलंगणा सिमेवर हे शिक्षक पहारा देत आहेत. अंतर्गत बंदोबस्तासाठीही शिक्षक पोलिस मित्राची भूमिका बजावित आहेत. लॉकडाउनमध्ये तालुक्यातील जवळपास १०५ शिक्षकांचा खडा पहारा सुरू आहे.