कोरोना सारख्या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर गोर गरीब व गरजू लोकांना आणखी एक मदतिचा हाथ आमदार मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून श्रीराम जन्मतिथी दिनापासून श्रीराम धान्य प्रसादाच्या वितरणाचा शुभारंभ.
खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर - (सदर वृत्त - वाचक आशिष देवतळे यांच्या माध्यमातून) -
काल दि.02/04/2020 ला श्रीराम नवमीच्या पावन दिवसाचे औचित्य डोळ्यासमोर ठेवून जवळपास 10 हजार गरजू,निराधार,मजूर व गोर गरीब नागरिकांना श्रीराम धान्य प्रसादाच्या किट्स वाटप कार्याचा शुभारंभ करण्यात आला.
कोरोना मुळे संपूर्ण देशामध्ये लॉकडाउन झाल्यामुळे अनेक बेसहाय्य आणि गरीबिशी झुंज करणाऱ्या जनतेवर भूकमरीची स्थिति उत्पन्न होऊ नये हाच शुद्ध विचार अंतकरनात ठेऊन आ.सुधीर मुनगंटीवार यांनी भारतीय जनता पार्टिच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकार्यांना जनतेला लागेल ते सहकार्य करा आपन कुठे ही जनतेच्या मदतीला कमी पडणार नाही असे आव्हान केले व मागील नऊ दिवसांपासून दिवसातून दोन वेळा सकाळ व रात्रीच्या जवळपास 4000 भोजनाची घरपोच सुविधा केली लोकांना व रुग्णाला वाहन सेवा सुरु केली ती आज पर्यंत सुरळीत सुरु आहे.
याव्यतिरिक्त कालपासून गरजू नागरिकांना श्रीराम धान्य प्रसाद म्हणून वितरीत होत असलेल्या जीवनाश्यक वस्तुंच्या किटमध्ये आटा (गव्हाची कणीक), तांदुळ, बेसण, तेल, मीठ, मिर्ची, हळद, पारले बिस्कीट, साखर, चहापत्ती, डेटॉल, बटाटे व कांदे या वस्तुंचा समावेश आहे.
काल बल्लारपूर शहरातील श्रीराम मंदीरात भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल व नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या हस्ते सदर किटची पूजा करून वितरण प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला.
यावेळी चंदनसिंहजी चंदेल, हरीशजी शर्मा, काशीजी सिंह, राजूजी गुंडेट्टी,आशिष देवतळे, कमलेशजी शुक्ला, प्रकाशजी धारणे, दत्ताभाऊ महादानी,यांची प्रामुख्याने उपस्थीती होती. पंडीत दिनदयाल वार्डातून गरीब, गरजूंना किट वितरीत करून या कार्याचा शुभारंभ करण्यात आला.
सदर श्रीराम धान्य प्रसादाचे वितरण बल्लारपूर शहरातील सर्व वर्डातिल गोर गरीबां पर्यंत पोहोचनार असा विश्वास आ.सुधीर मुनगंटीवार यानी व्यक्त केला व अशा संकटाच्या वेळी नागरिकांनी स्वताच्या घरीच राहून कोरोना सोबत लढ़ा देत जी देश सेवा केली त्या बद्दल समस्त जनतेचे आभार मानले.