चंद्रपुरात एकाच इमारतीतून 10 कार्यकर्ते ताब्यात घेऊन क्वारंटाईन ! #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपुरात एकाच इमारतीतून 10 कार्यकर्ते ताब्यात घेऊन क्वारंटाईन ! #COVID-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


येथील निजामुद्दीन मरकज चा मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांमधे कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून आला असून केंद्र सरकार ने या सर्वांची यादी जाहीर करून शोधमोहीम हाती घेतली असताना यात अनेक पॉसिटीव्ह रुग्ण आढळून  आल्यामुळे देशभरात खळबळ माजली असताना आज सकाळी पहाटे (काल रात्री उशिरा ) स्थानीय घुटकाला मधील मेमन मज्जिद दवाखान्या जवळ एका इमारतीतुन जमातचा 10 कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांचा उपचारासाठी मेडिकल कॉलेज च्या क्वारंटाईन केंद्रात पाठविन्यात आले आहे.

पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे चंद्रपूर शहरात चांगलीच खळबळ माजली आहे.कालच शहरातील रहमत नगर निर्जंतुकीकरण करून सील करण्यात आले होते. 

दिल्लीहुन परतलेल्या ३९ लोकांचा शोध जिल्हा प्रशासन मार्फत घेतल्या जात असून जमातशी संबधित दिल्लीचा कार्यकर्त्यांमधे चंद्रपुरात ताब्यात घेण्यात आले आहे. हे कार्यकर्ते ९ मार्च पासून चंद्रपुरात होते. या १० ही कार्यकर्त्यां चा होम क्वारंटाईनचा कालावधि संपला असला तरी खबरदारी चां उपाय म्हणून त्याना मेडिकल क्वारंटाईन मधे ठेवण्यात आले आहे.

निजामुद्दीन येथून आलेले सर्व 39 व्यक्तींची यादी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली होती असे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी पुढीलप्रमाणे जाहीर केले आहे. 

◾त्यापैकी केवळ एकाच व्यक्तीने निजामुद्दीन दर्ग्यातील मरकज मध्ये सामील झाली होती त्याला क्वारंटाईन केलेले आहे.
◾यादीतील इतर 3 व्यक्ती नागपूर मध्ये आहेत.
◾8 व्यक्ती इतर राज्यातील असून इतर जिल्ह्यात कायमचे स्थानांतरित झालेले आहेत. 
◾4 व्यक्ती चंद्रपूर चे रहिवासी असून नौकरी निमित्य बाहेर जिल्ह्यात आहेत. 
◾चंद्रपूर मध्ये बाकी 23 व्यक्ती आहेत, या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. 

अद्याप जिल्ह्यात एकही पॉसिटीव्ह रुग्ण नाही. तरीही खबरदारी घेत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.