चंद्रपुरात कोरोना तपासणीला मंजुरी -भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या मंजुरीची वाट :प्रस्ताव 1 कोटी 43 कोटीचा : #Approval-of-laboratory-proposal-for-corona-test-in-chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपुरात कोरोना तपासणीला मंजुरी -भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या मंजुरीची वाट :प्रस्ताव 1 कोटी 43 कोटीचा : #Approval-of-laboratory-proposal-for-corona-test-in-chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 7 एप्रिल 2020.

चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने चंद्रपुरात कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळा कार्यान्वित करावी, असा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता . या प्रस्तावाची गंभीरतेने दखल घेत शासनाने अवघ्या एका दिवसात मंजुरी प्रदान केली. त्यामुळे आता भारतीय वैद्यक संशोधन परिषद (आयसीएमआरला) अटी व शर्ती शिथिल करून प्रस्तावास मंजुरी देण्याची विनंती करू, अशी माहिती शासकीय वैद्यकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी दिली.

जगभरात कोरोना विषाणूने दहशत पसरवली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही काही कोरोना संशयित आढळून आलेत. मात्र, त्यांचे रक्तनमुणे नकारात्मक असून, सद्या जिल्ह्यात एकही कोरोना सकात्मक व्यक्ती नाही. तरीही जिल्ह्यातील व परिसरातील कोरोना संशयितांच्या चाचणीसाठी उशिर होऊ नये, तातडीने त्यांची चाचणी व्हावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने चंद्रपूर, यवतमाळ व गडचिरोली जिल्ह्यात कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्याचे निर्देश शासनाला दिले होते. 

त्याअनुषंगाने 3 एप्रिल रोजी भारतीय आयुर्विज्ञान संस्था, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे प्रयोगशाळा स्थापन करण्याचा प्रस्ताव पाठवला. हा प्रस्ताव 1 कोटी 43 कोटीचा आहे. या प्रस्तावात आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामुग्री व इमारतीचा समावेश आहे. शासनाने लगेच 4 एप्रिल रोजी या प्रस्तावास मंजुरी दिली.

आता भारतीय वैद्यक संशोधन परिषद (आयसीएमआर) कडे प्रस्ताव पाठवला जाणार असून, हा प्रस्ताव बुधवार किंवा गुरूवारी पाठवू. ही प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी आरसीएमआरच्या अटी व शर्ती पालन करावे लागते. ज्या भागामध्ये कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळा कार्यान्वित करावयाची आहे. त्या भागात शंभरहून अधिक कोरोना संशयितांची संख्या असावी, डोंगळ प्रदेश असेल तर 150 किलोमिटर परिसरात ही प्रयोगशाळा नसावी, यासह अन्य अटी आहेत. पण, आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त भाग असल्याने या जिल्ह्यासाठी अटी व शर्ती शिथिल करून प्रयोगशाळा कार्यान्वित करावी, अशी विनंती केली जाणार आहे - डॉ. एस. एस. मोरे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय वैद्यकीय महाविद्यालय.

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळा स्थापन करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे भारतीय वैद्यक संशोधन परिषद (आयसीएमआरला) अटी व शर्ती शिथिल करेल, असा विश्वास डॉ. एस. मोरे यांनी व्यक्त केला आहे.