तब्बल 1कोटीचे सागवान जप्त : 12 ट्रॅक्टर अवैध सागवान सोडून तस्कर पळाले : वनविभाची सर्वात मोठी कामगिरी #biggest sandalwood smuggling in chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

तब्बल 1कोटीचे सागवान जप्त : 12 ट्रॅक्टर अवैध सागवान सोडून तस्कर पळाले : वनविभाची सर्वात मोठी कामगिरी #biggest sandalwood smuggling in chandrapur

Share This

वनविकास महामंडळाच्या विशेष पथकाने चिमूर तालुक्यातील खडसंगीवनविभागाच्या कार्यक्षेत्रात जाऊन अंदाजे 1करोड किंमतीचे सागवान जप्त केल्याची धडाकेबाज कार्यवाही केली वनविभागातर्फे  अज्ञात आरोपींचा कसून शोध घेणे सुरु असून जिल्ह्यातील  साग-लाकूडफाटा तस्करांचे धाबे दणाणले आहेत. 


खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर प्रतिनिधी -

सविस्तर वृत्ता नुसार चिमूर तालुक्यातील चिमूर व खडसंगी वनपरिक्षेत्रा अंतर्गत भीसी उपक्षेत्र मधील भिसि ते जामगाव रोड लगत  काल दिनांक 12  एप्रिल रोजी रात्री 9:30 ते 10 वाजता च्या सुमारास  अज्ञात इसमाने खाजगी शेतात जवळपास 10पेक्षा अधिक  ट्रॅक्टर साग इमारत व साग बीटांची अवैधरित्या तोड करून साठवण ठेवल्याची गोपनीय माहिती वनविकास महामंडळाच्या विशेष पथकाला गुप्त रित्या दिली. 


माहितीची शहानिशा करत तात्काळ विशेष पथक प्रमुख रमेश बलैया वन परिमंडळ अधिकारी व आशिष बायस्कर क्षेत्र सहाय्यक भिसी, वनरक्षक आर.पी.आगोसे यांनी मोका स्थळावर जाऊन सदर 12 ट्रॅक्टर अवैद्य सागवान जप्त केले.याची बाजारात किमंत 1कोटी पेक्षा अधिक असल्याचे बोलल्या जात आहे.  घटनास्थळावर कोणीही आरोपीं न भेटल्यामुळे सध्या आरोपीचा शोध घेणे सुरू आल्याचे सांगितले. 


तसेच घटनास्थळ हे वन विभागाच्या कार्यक्षेत्रात असल्यामुळे चिमूर वनपरिक्षेत्र अधिकारी यांना श्री बलैया यांनी दूरध्वनीवर संपर्क करून घटनास्थळाची माहिती दिली तेव्हा चिमूर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी त्यांच्या वन कर्मचाऱ्यांना घटनास्थळावर पाठवून रीतसर कार्यवाही करण्याचे आदेश देत थेट कार्यवाही करण्यात आली तरीही तस्कर पळून जाण्यात यशस्वी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत.