येस बँक मुळे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खातेधारक शेतकरी अडचणीत ! #yes bank #cdccbank - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

येस बँक मुळे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खातेधारक शेतकरी अडचणीत ! #yes bank #cdccbank

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


गेल्या महिनाभरापासून येस बँक ची आर्थिक स्थिती खूप डबघाईस आली आहे. त्यामुळे येस बँकेच्या व्यवहारावर निर्बंध लादण्यात आले आहे. यामुळे आता मोठ्या व्यवसाईकांसोबत शेतकर्‍यांचे  नुकसान होत आहे . शेतकर्‍यांचा  जास्तीत जास्त पैसा हा जिल्हा बँकेत असतो आणि जिल्हा बँकेचा IFSC CODE हा येस बँकेचा आहे त्यामुळे शेतकर्‍यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सीसीआयला टाकलेल्या कापसाचा पैसा थांबला -

यंदा जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी आपला कापूस सीसीआय ला विकला कापसाचा पैसा हा ऑनलाइन पद्धतीने महिनाभराच्या कालावधीत शेतकर्‍यांच्या  खात्यावर जमा करण्यात येते. ज्या शेतकर्‍यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँकेचे खाते जोडले असेल त्यांचे पैसे खात्यात जमा होत असल्याचे कारण पुढे आले आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा IFSC CODE हा येस बँकेचा आहे त्यामुळे शेतकर्‍यांचे कापसाचे चुकारे थांबले आहे.