चिमुकलीची आर्त हाक : मुनगंटीवारांची त्वरित साद : नक्की वाचा काय आहे प्रकरण ! #WATERGAINING - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चिमुकलीची आर्त हाक : मुनगंटीवारांची त्वरित साद : नक्की वाचा काय आहे प्रकरण ! #WATERGAINING

Share This
-चिमुकलीच्या मागणीवर आ.सुधीर मुनगंटीवार यांची  त्वरित दखल.खबरकट्टा / चंद्रपूर : 

आज दि.26/03/2020 रोजी बल्लारपुरच्या गीमा कंपनीतिल कामगार क़्वारटर च्या टीना परसुरक या चिमुकलिने वीडियो च्या माध्यमातून पिण्याचे पानी ची समस्या असल्याचे सोशल माध्यमांवर विडिओ वायरल करीत सांगितले. 

या एरियात जवळपास 13 परिवरतील 44 नागरिक राहतात व सर्वत्र बंद असल्यामुळे त्यांना अनेक समस्याचा सामना करावा लागत आहे त्यातच त्यांना पिण्याचे पानी सुद्धा मिळत नसल्याचे वीडियो द्वारे  या चिमुकलीने या विडिओ मध्ये सांगितले आहे. सध्या कोरोना मुळे संपूर्ण देशात संचारबंदी असून जास्तीत जास्त माहितीचे आदान - प्रदान हे सोशल माध्यमातून होत आहे त्यामुळे सर्वच या माध्यमांवर लक्ष ठेऊन आहेत. अश्यातच या चिमूलकीच्या पाण्यासाठी आर्त हाकेचा विडिओ बल्लारपूर क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या व्हाट्स अँप वर पोहोचतो.नोटिफिकेशन येताच आमदार साहेब हा  विडिओ  1 मिनिटात नेमका बघतात, पुढे लगेच बल्लारपुरच्या पदाधिकार्यांशी फ़ोनवर संपर्क करताच  तातडीने तेथील लोकांना मदत पुरविन्याचे आदेश देतात. 

त्यानंतर  काही वेळातच बल्लारपुरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा चे शहर महामंत्री मनिश पांडे, भाजयुमो जिल्हा महामंत्री आशीष देवतळे यांनी या वस्तीत जाऊन लोकांची भेट घेऊन संपूर्ण समस्या जाणून घेतल्या व त्वरित त्यांना रोज टैंकर द्वारा पाणी पुरविन्याची व्यवस्था करण्यात आली. 

तशी आमदार सुधीर मुनगंटीवार यांची कार्यतत्परता यापूर्वीही अनेकांच्या चर्चेतून कानीं पडली परंतु आज प्रत्येक्ष अनुभव घेतल्याची प्रतिक्रिया टीना परसुरक या चिमुकलीच्या पालकांनी दिली. यांनी मदतिचा हात दिल्यामुळे त्या सर्व नागरिकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले व सर्वांनी आमदार  मुनगंटीवार यांचे आभार मानले असून त्या चिमुकलीचे सुद्धा अभिनंदन जिच्या समयसूचकतेने तिचा परिवार व शेजारी समस्येच्या समाधानापर्यंत पोहोचले.