सामान्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर व्यक्तीमत्व "सुरज ठाकरे " : संचारबंदीत घोटेकर कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारासाठी तात्काळ मदत : प्रशासनिक मदतीसहित समाजसेवा लोकप्रतिनिधिं ना लाजविणारे कौतुकास्पद कार्य #Surajthakre #COVID-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सामान्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर व्यक्तीमत्व "सुरज ठाकरे " : संचारबंदीत घोटेकर कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारासाठी तात्काळ मदत : प्रशासनिक मदतीसहित समाजसेवा लोकप्रतिनिधिं ना लाजविणारे कौतुकास्पद कार्य #Surajthakre #COVID-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा 
राजुरा विधानसभेत समाजसेवेसाठी सुपरिचित प्रहारचे सूरज ठाकरे यांच्या समाजसेवेचा प्रत्यय नेहमीच तत्परतेणे अनेकांना आला आहे. जे आमदारांनाही जमत नाही ते सुरज दादा लगेच मदत पाठवतात असे अनेकांच्या ओठी यायला लागले आहे. याचा नुकताच प्रत्यय नांदाफाटा येथील जनतेनी अनुभवला.

देशभरात लाँकडाऊन परिस्थिती असतांना कोरपना जवळील नांदा फाटा येथील निवासी विलास घोटेकर यांचे अकरा वर्षिय मुलाची प्रकृक्ती बिघडली होती . त्याला लिव्हरचा आजार झाला असून त्याला उपचारार्थ रुग्णालयात हलविणे घोटेकर कुंटुबियांना अतिशय महत्वाचे होते. त्यांनी आजूबाजूच्या अनेक लोकप्रतिनिधींना आपली अडचण कडकडीने सांगून मदत मिळाली नाही तर एका मोठया पदावर असलेल्या लोकप्रतिनिधी ने चक्क आता 31 डिसेंबर पर्यंत काहीच होऊ शकत नाही असे उत्तर दिल्यावर निराश झालेल्या घोटेकर यांनी याच परिस्थितीत त्यांनी प्रहारचे सुरजदादा ठाकरे यांचेशी भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधला.
नेहमीप्रमाणे  ठाकरे यांनी परिस्थितीचे गांभीर्य तात्काळ लक्षात घेता त्या मुलाला दवाखाण्यात नेण्यांसाठी अँम्बुलन्स उपलब्ध करुन देत थेट दोन कार्यकर्त्यांसहित अँम्बुलन्स घरी पाठविली. त्यानंतर लगेच अवघ्या 4तासात  घोटेकर आपल्याला आजारी मुलासहित  सावंगी वर्धा येथील दवाखान्यात दाखल झाले.  सध्या त्या आजारग्रस्त मुलाचा उपचार सावंगी मेघे येथील रुग्णालयात सुरु असल्याचे समजते.

कोणताही प्रशासकीय किंवा लोकप्रतिनिधिक पद नसतानाही सामन्यातील सामान्य व्यक्तीला सहज मदतीचा हाथ पुढे देणाऱ्या सुरज ठाकरेंचे कार्य राजुरा विधानसभेतील अनेक लोकप्रतिधींना लाजविणारे आहे.