एकटेपणाला कंटाळून वयस्क इसमाची पूर्वनियोजित आत्महत्या : राजुरा तालुक्यातील रामपूर येथे झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले शव #suicide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

एकटेपणाला कंटाळून वयस्क इसमाची पूर्वनियोजित आत्महत्या : राजुरा तालुक्यातील रामपूर येथे झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले शव #suicide

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -




राजुरा तालुक्यात एकटेपणाला कंटाळून वयस्क इसमाची पूर्वनियोजित आत्महत्या आज दुपारी 2च्या सुमारास  तालुक्यातील रामपूर पासून जंगली भागातील एक किलोमीटरवर  येथे झाडाला लटकलेल्या अवस्थेत शव आढळले.




सविस्तर वृत्तानुसार मृतक राजू नानाजी राडे (अंदाजे 55) राजुरा इंदिरा नगर येथील रहिवासी असून तो शहरातीलच एका शिंपी व्यावसायिकाकडे मदतनीस म्हणून काम करायचा. राडे यांचे पत्नीचे फार पूर्वी निधन झाले असून त्यांना एक  मुलगी व मुलगा आहे. परंतु मुलीचा विवाह होऊन ती सासरी गेली व मुलगा सुद्धा कामानिमित्त घुग्गुस येथे राहतो त्यामुळे मृतक हा घरी एकटाच राहायचा. 

घरी एकटेपणा व करावी लागत असलेली सर्व कामे यामुळे तो कंटाळला असल्याची तक्रार नेहमी आजूबाजूला करत असे. त्यातच काल त्याने आता अस्या एकटेपणाचा कंटाळा आला असून मी जिवन संपविण्याचे ठरविले असल्याचे काही परिचितांना सांगितले होते. 



आज दिनांक 17 मार्च  ला दुपारी 2च्या आसपास रामपूर लगतच्या जंगलात एक व्यक्ती झाडाला फास लावून लटकून असल्याची माहिती राजुरा ठाण्याकडे आली. राजुरा पोलीस चमूने तात्काळ घटनास्थळ गाठत तपास केला असता मृतकाची ओळख पटून सदर वास्तव समोर आले. 

पोलिसांनी मर्ग दाखल करून  मृतकाच्या मुलाला संपर्क साधून तात्काळ बोलावून घेत शवविच्छेदन करून शव सुपूर्द केले आहे.