तीन दिवसात चार आत्महत्येने शहर हादरले : बंडू मालेकर यांची आत्महत्या ! Suicide series in rajura - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

तीन दिवसात चार आत्महत्येने शहर हादरले : बंडू मालेकर यांची आत्महत्या ! Suicide series in rajura

Share This
खबरकट्टा : चंद्रपूर/ राजुरा -

राजूरा तालूक्यात आत्महत्यांचे सत्र सूरुच आहे. महीलेचा आत्महत्येला चार तास उलटले नसतांना वेकोली कामगाराचा आत्महत्येने खळबळ उडाली आहे. सास्ती भूगर्भ खाणीतील कामगार  बंडू नथु मालेकर (वय ५५) यांनी रामपूर गावालगत असलेल्या  जंगलात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

   
प्राप्त माहितीनुसार शांत व संयंमी स्वभावाचे धनी अशी ओळख  असलेले बंडू मालेकर हे वेकोलीच्या सास्ती भूगर्भ खाणीत सामान्य मजदूर म्हणुन कार्यरत होते. त्यांची रात्र पाळीत ड्युटी असल्याने ते घरीच होते. आज ते घराबाहेर पडलेत. गावालगत असलेल्या  जंगलातील लिंबाच्या झाडाला मालेकर यांनी  गळफास घेतल्याची माहिती शेळ्या राखणार्या व्यक्तीने गावात सांगितली. सदर वार्ता वाऱ्यासारखी पसरली. 

गावकर्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांच्या पश्चात्य पत्नी व तीन मुले असा आप्त परिवार आहे. या घटनेने रामपूर गावात शोककळा पसरली आहे.राजूरा तालूक्यात तीन दिवसात चार आत्महत्या झाल्याने तालूका हादरला आहे.