वेकोलि कर्मचाऱ्याची राजीव रतन हॉस्पिटलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या #कोरोनाच्या अफवेने शहरात धुमाकूळ - परिस्थिती नियंत्रणात #suicide #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वेकोलि कर्मचाऱ्याची राजीव रतन हॉस्पिटलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या #कोरोनाच्या अफवेने शहरात धुमाकूळ - परिस्थिती नियंत्रणात #suicide #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


 जगात, देशात, राज्यात व जिल्ह्यात कोरोना विषाणूने नागरिकांना सळो की पळो करून सोडले आहे, कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली आहे.


अश्यातच घुग्गुस येथील वेकोलीच्या राजीव रतन हॉस्पिटलमध्ये वेकोली कर्मचारी सुरेश हिरादेवे ने गळफास लावत आत्महत्या केली, मृतक सुरेश ने हॉस्पिटल परिसरातील एका खिडकीला गळफास घेतला.

मृतक वेकोली कर्मचारी होता त्याला दारूचं व्यसन असल्याने एक दिवस आधी सुरेश ला राजीव रतन हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते.कंटाळून जाऊन अखेर त्याने 24 मार्चला हॉस्पिटल परिसरातच गळफास घेतला, हॉस्पिटलसारख्या संवेदनशील क्षेत्रात रुग्णाने इतकं मोठं कृत्य केलं असता हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचा याकडे दुर्लक्ष कशे झाले यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सुरेश च्या मृत्यूनंतर अफवेचा बाजार गरम झाला, त्याला कोरोना झाला होता म्हणून त्याने आत्महत्या केली अशी अफवा घुग्गुस परिसरात वाऱ्यासारखी पसरली, सुरेशचा मृत्यूचे कारण वेगळे होते, प्रशासनाने आधीच कोरोना संदर्भात अफवा उडविणाऱ्यावर कारवाई करण्याचे जाहीर केले आहे म्हणून कुणीही असल्या प्रकारची अफवा पसरवू नये. घरी राहून कोरोना होण्यापासून स्वतःचा व परिवाराचा प्रतिकार करा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.