आवर्जून वाचा : सामाजिक संदेशानी नटली लग्न पत्रिका ! #socialreformer marraige card - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आवर्जून वाचा : सामाजिक संदेशानी नटली लग्न पत्रिका ! #socialreformer marraige card

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : ब्रम्हपुरी : 


ब्रम्हपुरी तालुक्यातील मुडझा येथील लोकेश मधुकर कावळे हे चंद्रपुर जिल्ह्य परिषदेचे गटनेते सतीश वारजूकर यांचे विश्वासू साहाय्य (पि. ए.)म्हणून काम पाहतात. या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. याच संधीला हेरून त्यांनी विविध सामाजिक संदेश देणारी आपली लग्नपत्रिका तयार केली असून त्यांच्या संपर्कातील अनेकांनी या आकर्षक समाजपरिवर्तनीय पत्रिकेचे कौतुक केले आहे. 

सर्व जुन्या रिती रुढीला बाजुला सारून त्यांनी चक्क विवाह प्रत्रिकेत त्यांनी मुलगा - मुलगी आहे समान, दोघेही उंचवती देशाची मान, स्वच्छता संदेश, बेटी बचाओ, जल है तो कल है, नेत्रदान, रक्तदान, जय जवान, जय किसान, पर्यावरण संदेशानी व थोर महापुरुषांच्या प्रतिमा व त्याचे विचारांनी ही विवाह प्रत्रिका नटवल्या गेली आहे. लोकेश अनेक दिवसांपासून सतीश वारजूकर यांचे विश्वासू साहाय्य पि. ए. असल्याने सामाजिक कार्य करत असतात. त्यांनी देवी देवतांच्या प्रतिमा व मंत्र या अनेक वर्षोंपासुन होत असलेल्या रिती रूठीना बगल देत त्यांनी समाजाला सामाजिक व महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा देणारी लग्न पत्रिका काढली. 

अशा वैचारिक प्रेरणादायी व सामाजिक संदेश देणार्‍या मण्यांनी सजलेल्या लग्न पत्रिका यामुळे आज तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. अशा स्तुप्त कौतुकास्पद उपक्रमामुळे लोकेशचे नागरिकांनी आनंद व्यक्त करीत आहेत.