चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये अचानक शॉर्टसर्किट ! #short circuit - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये अचानक शॉर्टसर्किट ! #short circuit

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :-

चंद्रपूर जिल्ह्याची मिनी मंत्रालय समजना झालेल्या जिल्हा परिषद मध्ये दुपारी एक-दीडच्या सुमारास अचानक गेटसमोरील असलेल्या विद्युत सर्किट असलेल्या डीपीला शॉर्टसर्किट झाला. त्याचा आवाज व निघणारा धूर पाहून जिल्हा परिषद मध्ये हालचाल सुरू झाली होती. मात्र येथील काही कर्मचारी चा संवेदनशील पणामुळे लगेच त्यांनी समोर असलेले रेती आग लागलेल्या डीपीवर टाकून आग आटोक्यात आणली. जिल्हा परिषद मधील काही वेळासाठी विद्युत  गेल्यामुळे  कर्मचाऱ्यांना अंधारात राहाव लागले.   


जिल्हा परिषद मध्ये  कामासाठी आलेल्या नागरिकांना  काही   काळ ताटकळत करावे  लागले. अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे चांगलीच तारांबळ उडाली. काहीच्या म्हणण्याप्रमाणे ही आग अति  तान आल्यामुळे  शॉर्टसर्किट   झाले असावे असा अंदाज वर्तविला जात होतं.  मात्र एवढे मात्र नक्कीच की अशा शॉर्टसर्किटमुळे कधीही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.