“होय आम्ही शिवसेनेला फसवले” मुनगंटीवारांची विधानसभेत खळबळजनक कबुली.#shivsena #bjp #sudhir mungantiwar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

“होय आम्ही शिवसेनेला फसवले” मुनगंटीवारांची विधानसभेत खळबळजनक कबुली.#shivsena #bjp #sudhir mungantiwar

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र :

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर नाट्यमय घडामोडी पहायला मिळाल्या. अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजप मध्ये खटके उडाले. याच मुद्द्यावरून शिवसेना भाजप वेगळे झाले. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत मिळुन सरकार स्थापन केले.


याच संदर्भात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत धक्कादायक वक्तव्य केले आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की होय आम्ही निवडणूक निकालानंतर शिवसेनेला फसवले. आम्ही चुकलो मात्र या चुकीचा खुप मोठा फायदा शिवसेनेने घेतला असं खळबळजनक वक्तव्य करून या वादात कोण खरं आणि कोण खोटं यावर पडदा टाकला आहे.

लोकसभा निवडणुकीत युती करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एक बैठक झाली होती. त्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांनी सर्व पदांचं आणि जागांचं समसमान वाटप केले जाईल अशी माहिती दिली होती.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेनं अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा शब्द आठवून देऊन भाजपसमोर प्रस्ताव ठेवला. मात्र अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा कुठलाही शब्द भाजपने दिला नाही असं बोलून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला. या मुद्यावर दोन्ही पक्षांनी अनेक दावे प्रतिदावे केले.

भाजप दिलेला शब्द पाळत नाही हे कारण सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना सोबत घेऊन महाविकासआघाडीचं नविन सरकार स्थापन केलं. नवीन सरकार स्थापन केल्यापासून भाजपकडून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले जात होते.

मात्र आज दस्तुरखुद्द सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत जाहीर केले की भाजपने शिवसेनेला फसवले. त्यामुळे भाजपने शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता हे सिद्ध झाले असुन विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे जे बोलत होते तेच सत्य होते हे उघड झाले आहे.

पुढे बोलताना मुनगंटीवार म्हणाले की आम्ही केलेल्या चुकीचा शिवसेनेने फार मोठा गैरफायदा करून घेतला. या सरकारमध्ये सुद्धा एखादा ज्योतीरादित्य सिंधीया तयार होईल आणि हे सरकार जास्त काळ टिकून राहणार नाही असं ते म्हणाले. सरकारला १०० दिवस पुर्ण झाले आहेत पण ज्या दिवशी सरकारचे १०० अपराध पुर्ण होतील त्यादिवशी हे सरकार पडेल असं मुनगंटीवार यांनी सांगितले.