नगर परिषद बल्लारपुरचा विधायक उपक्रम - रैन बसेरा #Shelter Home - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नगर परिषद बल्लारपुरचा विधायक उपक्रम - रैन बसेरा #Shelter Home

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर प्रतिनिधी -
आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या गोर गरीबांना मदत करण्याच्या कार्यापसुन प्रेरणा घेत दि. 28/03/2020 पासून बचत भवन बल्लारपूर येथे रैन बसेरा  सुरू करण्यात आले आहे. 

देशातच नव्हेतर जगात थैमान घातलेल्या कोरोना विषानुचा संसर्गाची चैन तोडण्याकरिता शासनाच्या कर्फ्यु (बंद) च्या दरम्यान बाहेरील गावाचे नागरिक जे बल्लारपुर शहरात अडुन पडले आहे. असे व बल्लारपुरातील अस्थायी नागरिकांसाठी बल्लारपुर नगर परिषदेचे अध्यक्ष हरीश शर्मा यांच्या मार्गदर्शनात व मुख्याधिकारी विपिन मुध्दा यांच्या नियोजनांतर्गत  रैन बसेरा शेल्टर होम नगर परिषदेच्या  बचत भवनात सुरवात करण्यात आले.या ठिकानी प्रवासी नागरिकांना राहण्याची व भोजनाची सोय करण्यात आली आहे. 
विशेष म्हणजे  पहिल्याच दिवशी अहेरी वरून भोपाळ जाणाऱ्या 8 लोकांना आणि बल्लारपूर शहरातील निराश्रित 5 लोकांना यात आसरा देण्यात आला. तसेच नगर परिषद बल्लारपूर हद्दीतील सर्व नागरिकांना सूचित करण्यात आले आहे की , ज्या गरजू व्यक्तिंना कोरोना विषाणू मुळे लॉकडाऊन कालावधीत राहण्याची सोय नाही. अशा व्यक्तींसाठी नगर परिषद ने बचत भवन ( नगर परिषद बल्लारपूर चे कार्यालयाचे मागे ) येथे रैन बसेरा ची सोय केलेली आहे.   
                
 करिता गरजू व्यक्तींनी नोंदणी साठी
◾अभिजीत मोटघरे  मो. न:- 8600694021    
◾नरेश गेडाम मो. न :- 9764222386.                ◾न. प. व्हॉट्सअप क्र 9130052358
◾टोल फ्री क्र 18008330733 
या क्रमांकावर वर संपर्क साधावा.

नगर परिषद बल्लारपूर मार्फत शहरातील प्रमुख विविध ठिकाणी हात धुण्याकरिता पाणी व हँड वॉश ची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. 
या लोकउपयोगी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून. या विधायकी उपक्रमास  चंदन भैय्या चंदेल (माजी वनविकास महामंडल अध्यक्ष)व हरीश भैय्या शर्मा (बल्लारपुर नगराध्यक्ष व भाजपा जिल्हाध्यक्ष)यांच्या नेतृत्वात सतविंदर सिंह दारी ( भाजपा ट्रांसपोर्ट सेल जिल्हाध्यक्ष) काशी सिंग(भाजपा शहर अध्यक्ष), मनीष पांडे(भाजपा शहर महामंत्री), राजू गुंडेट्टी(भाजपा तेलगु आघाडी जिल्हाध्यक्ष), आशीष देवतळे(भाजयुमो जिल्हा महामंत्री), गुलशन शर्मा(भाजपा ट्रांसपोर्ट आघाड़ी तालुका अध्यक्ष), स्वामी रायबरम (नगर सेवक), एलैय्या दासरफ़( नगर सेवक), गणेश बहुरिया(नगर सेवक), आशा ताई संगिड़वार(नगर सेविका), पुनमताई मोडक(नगर सेविका), सारिका ताई कनकम(नगर सेविका), सुवर्णा भटारकर(नगर सेविका), विक्की दूपारे (दलित आघाड़ी महामंत्री), मुन्ना ठाकुर, सतीश कनकम,सलिमभाई, राजू दासरवार, हेमा डंबारे, दिनेश राखूंडे,नफीस अंसारी यांनी सहकार्य केले.