अवैध वाळू उपसा झाल्यास सरपंच तसेच पोलीस पाटलावर थेट होणार कार्यवाही??? पोलीस पाटलांचे अवैध तस्करांशी साटेलोटे : वनोजा -सांगोडा अवैध घाट बंद झाल्यावर भोयेगाव -भरोसा येथून जोमाने वाळू तस्करी सुरु. भोयेगाव च्या पोलीस पाटलांनी प्रशासनाकडे तक्रार सादर केली काय??? #sand trafficking - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अवैध वाळू उपसा झाल्यास सरपंच तसेच पोलीस पाटलावर थेट होणार कार्यवाही??? पोलीस पाटलांचे अवैध तस्करांशी साटेलोटे : वनोजा -सांगोडा अवैध घाट बंद झाल्यावर भोयेगाव -भरोसा येथून जोमाने वाळू तस्करी सुरु. भोयेगाव च्या पोलीस पाटलांनी प्रशासनाकडे तक्रार सादर केली काय??? #sand trafficking

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :जिल्ह्यात अवैध वाळू उपसाच्या मोठ्या तक्रारी पहाता आता अवेध वाळू उपसा झाल्यास ग्रामपंचायत स्तरावरील ग्राम दक्षता समितीस जबाबदार धरण्यात येणार आहे. या ग्राम दक्षता समितीचे अध्यक्ष हे सरपंच राहतील. त्याचवेळी अवैध वाळू उपसा झाल्यास सरपंच तसेच पोलीस पाटलावर थेट कारवाई करण्याचे निर्देश नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात जवळपास दिडशेहून अधिक वाळू घाट आहेत. या वाळू घाटांचे सर्वेक्षण तालुकास्तरीय समितीकडून केले जात आहे. या समितीने सादर केलेले प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठविले जातात. पर्यावरण विभागाच्या मंजुरी नंतर वाळू घाटाची लिलाव प्रक्रिया सुरु केली जाते. जिल्ह्यात गेल्या काही वर्षात वाळूला प्रचंड मागणी होत आहे. परिणामी वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा सुरु आहे. यातून पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे. या पार्श्वभूमीवर तक्रारीही वाढल्या आहेत. या तक्रारीत तथ्यही आढळत आहे.या पार्श्वभूमीवर  नांदेड जिल्हाधिकारी डॉ. ईटणकर यांनी अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी ग्रामस्तरावर दक्षता समिती गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या गावामध्ये वाळू गट किंवा साठे असतील तेथे या ग्राम दक्षता समिती स्थापन केल्या जाणार आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच हे अध्यक्ष असतील तर ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल हे सदस्य म्हणून राहतील. सदस्य सचिव म्हणून तलाठी कार्यरत राहणार आहेत. या समितीची दर पंधरा दिवसाला बैठक घेवून गावात अवैध वाळू उपसा होत असल्यास त्याबाबतची माहिती तहसीलदाराना द्यायची आहे. जिल्ह्यात ग्रामस्तरावर सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांचे दुर्लक्ष होत असल्याने वाळू उपसा वाढल्याचे स्पष्ट करुन आगामी काळात जेथे अवैध उपसा होईल तेथे ग्राम दक्षता समितीस जबाबदार धरले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचवेळी ग्रामपंचायत हद्दीतून नदीपात्रात वाळू उपसा होत असल्यास संबंधीत सरपंचा विरुध्द ग्रामपंचायत अधिनियमानुसार तर पोलीस पाटला विरुध्द ग्राम पोलीस अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

याच धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्यातील वाढते अवैध उत्खनन व वाहतुकीचे प्रमाण लक्षात घेता चंद्रपूर जिल्हाधिकारी सुद्धा याच पद्धतीचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत? 

चंद्रपूर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी अवैध वाळू उत्खनन सुरु असून संबंधात वारंवार जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी देऊनही वाळू तस्कर आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. अनेक प्रसंगातून या वाळू तस्करांना ग्राम पातळीवर सरपंच ते पोलीस पाटील यांची थेट मदत मिळत असल्याने अधिकारी येतात कार्यवाही करून जातात परत 2-3दिवसांनी गावात मिळणाऱ्या पोलीस पाटीलांच्या जोरावर पुन्हा नवनवे रस्ते काढून जोमाने तस्करी सुरु होत असल्याचे नुकतेच चित्र कोरपना तालुल्यातील पिपरी या गावातील खुद्द पोलीस पाटलांना वाळू तस्करीत अटक झाल्यावरही प्रशाशनाकडून अजूनही त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. 

उलट पंचक्रोशीतील काही पोलीस पाटील मिळून आमच्या हातात काही नसून. माहिती देऊनही वरिष्ठ अधिकारी कार्यवाही करत नसल्याची ओरड करीत असून प्रत्यक्षात मात्र एकही पोलीस पाटलाने गावात सुरु असलेल्या अवैध धंद्यांबाबत प्रशाशनाकडे तक्रार दाखल केली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 

काही जागरूक तत्वांनी कोरपना तालुक्यातील अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीची माहिती जिल्हा प्रशासनाकडे दिल्यावर तात्काळ वनोजा व सांगोडा अवैध घाट बंद करण्यात असले तरीही लगतच्या भोयेगाव- भरोसा मार्गाकडे या तस्करांनी मोर्चा वळविला असून या दोन्ही गावातील पोलीस पाटील प्रचंड प्रमाणात सुरु असलेल्या वाहतुकीबद्दल अनभीज्ञ कसे प्रश्नचिह्न आहे. 

जिल्ह्यातील वाळूची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे वाळूचे दर गगनाला भिडले आहे. दुसरीकडे लिलावाविनाच मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करून तस्करी केली जात आहे. या वाळू व्यवसायात प्रशासकिय अधिकाऱ्यांसह पोलीस, राजकारणी, ग्रामस्तरावरील सरपंच, पोलीस पाटील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या इशारामुळे आता सरपंचासह पोलीस पाटलांचीही तारांबळ उडणार आहे़ हे मात्र नक्की.