महसूल प्रशासनाला न जुमानता पुन्हा वाळु तस्करी : सांगोडा वनोजा पात्र बंद केल्यावर भोयेगाव शिवारातून नवीन रस्ता तयार करून जोमाने वाळू तस्करी सुरु #sand trafficking - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महसूल प्रशासनाला न जुमानता पुन्हा वाळु तस्करी : सांगोडा वनोजा पात्र बंद केल्यावर भोयेगाव शिवारातून नवीन रस्ता तयार करून जोमाने वाळू तस्करी सुरु #sand trafficking

Share This
वाळू तस्करानी उपविभागीय अधिकार्यांना दिले खुले आव्हान " तुम्ही कितीही रस्ते बंद करा आम्ही नवीन रस्ते काढु"

खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -


कोरपना तालुक्यातील सांगोडा ,वनोजा जवळील नदी पात्रातून सरासपणे वाळू चोरी जात आहे या संदर्भात   जिल्हाधिकारी यांना तक्रार सादर करताच  लगेच जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत सांगाडा व वनोजा रेती वाहतूक होत असलेल्या रस्त्यावर जेसीबीने आडवी  नाली खोदून रस्ता बंद केला काही दिवस रेती  तस्करी बंद होती.

परंतु चोर चोरी केल्या शिवाय राहू शकत नसल्याने पुन्हा नवीन युक्ती लढवत पुन्हा नवीन रस्ता तयार करण्यात आला आहे. आता  भोयगाव शेतशिवारातुन वर्धा नदी पात्रातून रात्रीच्या वेळी अवैधरीत्या गौन खनिज मानल्या जाणार्‍या वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात पुन्हा सुरू झाला असून, वाळूमाफियांचा वर्धा नदी पात्रात रात्रभर उपसा व वाहतूक सुरू आहे. 

संपूर्ण नदीपात्र वाळूमाफिया रिकामे करत आहेत, त्यामुळे पर्यावरणाचा र्हास होतानाचे दिसुन येत आहे. दररोजच्या उपस्यामुळे शासनाचा कोटयवधी रुपयांचा महसूल पाण्यात बुडत आहे. रात्री दहा ते सकाळी आठ वाजेच्या सुमारास वाळूची (रेतीची) चोरी केली जात आहे. या भागातील रात्रीच्या वाहतुकीमुळे ट्रॅक्टरांच्या कर्णर्कश आवाजाने ग्रामस्थांची झोप उडाली आहे. व परिसरातील शेतकर्‍यांचे धुळीमुळे पिकांची नासाडी होताना दिसत आहे.


या वाळूमाफियांची प्रशासनावर करडी नजर असुन, त्यांचे खबरी प्रशासनाच्या पावला पावलांची खबर वाळूमाफियांना देत राहतात. या वाळूमाफियांना प्रशासनातीलच काही भ्रष्ट कर्मचारी माहिती देत असून, यामध्ये मोठ्या आसामी असल्याचे बोलले जात आहे. संध्याकाळी दहाच्या नंतर हे वाळूमाफिया आठ ते दहा ट्रॅक्टर द्वारे प्रशासनाला न जुमानता सर्रासपणे वाळूची तस्करी करतात. 

सदरील वाळूमाफिया रात्री सुसाट वेगाने ट्रॅक्टर चालवत असून, रस्त्याने येणार्‍या जाणार्‍यांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. सदरील भागात कुठल्याही प्रकारचा ठेका (टेंडर) नसतानाही अवैधरीत्या बेसुमार वाळू उपसा करून शासनाच्या कोटयवधी रुपयांच्या महसूल बुडविल्या जात आहे. 

स्थानिक प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.   भोयगाव या भागातील  नदीपात्र पोखरून हजारो ब्रास वाळूची चोरी करून परिसरातील गडचांदुर नांदाफाटा या भागामध्ये चढ्या दराने वाळू विकून माफिया कोटयवधींची कमाई करत आहेत. सदरील प्रशासनाने वाळूमाफियांवर कडक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी सदरील भागातील ग्रामस्थांमधुन होत आहे.