ओव्हरटेक करण्याच्या घाईत मुख्याध्यापकाचा मृत्यू : ट्रॅक्टर सोबत भिडत होऊन दुचाकी फरफटत गेली. : धानोरा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक लिंगु मेश्राम घटनास्थळीच मृत. #roadaccident - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ओव्हरटेक करण्याच्या घाईत मुख्याध्यापकाचा मृत्यू : ट्रॅक्टर सोबत भिडत होऊन दुचाकी फरफटत गेली. : धानोरा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक लिंगु मेश्राम घटनास्थळीच मृत. #roadaccident

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -राजुरा तालुक्यातील नलफडी सिंधी मार्गावर ट्रॅक्टर ला भरधाव दुचाकीने  ओव्हरटेक करताना झालेल्या धडकेत विरूर स्टेशन जवळील धानोरा येथिल जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक लिंगु मेश्राम ह्यांचे सकाळी 9 वाजताच्या आसपास घटनास्थळीच निधन झाले.आज दिनांक 18 मार्च ला सकाळी 9 ते 9:30 वाजताच्या दरम्यान  धानोरा येथिल जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक लिंगु मेश्राम  हे  नेहमीप्रमाणे नलफडी सिंधी  मार्गाने शाळेत जात  असताना नलफडी पासुन काही   अंतरावर भरधाव दुचाकीने असलेले मेश्राम यांनी ट्रॅक्टर ला ओव्हरटेक करत असताना ट्रॅक्टर व गाडीची भिडत होऊन हा अपघात झाल्याचे प्रत्यदर्शीने टीम खबरकट्टा ला सांगितले असून त्यात  मुख्याध्यापक लिंगु मेश्राम  ह्यांचे जागीच निधन  झाले.सदर अपघातस्थळ हे राजुरा तालुक्यातील स्टेशन विरूर पोलीस ठाण्यांतर्गत आहे. घटनास्थळी चमू दाखल होऊन विच्छेदनाकरिता शव ताब्यात घेतले असून घटनास्थळून फरार झालेल्या चालकास व ट्रॅक्टर मालकास ट्रॅक्टर विरूर पोलीस ठाण्यात जमा करण्यास सांगण्यात आल्याची माहिती टीम खबरकट्टा ला दिलेली आहे.